धामणा येथे उडीद पिकाच्या शेतीशाळेमध्ये मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:14 IST2021-07-10T04:14:16+5:302021-07-10T04:14:16+5:30
या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून येथील सरपंच उज्ज्वला भांबेरे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विद्यावेत्ता विभागाचे प्रमुख डॉ. पार्लावार, ...

धामणा येथे उडीद पिकाच्या शेतीशाळेमध्ये मार्गदर्शन
या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून येथील सरपंच उज्ज्वला भांबेरे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विद्यावेत्ता विभागाचे प्रमुख डॉ. पार्लावार, डॉ. आदिनाथ पसलवार, डॉ. जे.पी. देशमुख, डॉ. विकास गौड, डॉ. पतके, तालुका कृषी अधिकारी डी.एस. प्रधान, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही.एम. शेगोकार यांची उपस्थिती होती. त्यानंतर आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक शेगोकार यांनी उपस्थित शेतीशाळेमधील शेतकऱ्यांना आंतरमशागत, पीक व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. तर डॉ. पार्लावार, डॉ. गौड, डी.एस. प्रधान यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी शेतीशाळामध्ये पुरुष शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. उडीद पिकाची शेतीशाळा यशस्वी करण्याकरिता सहा तंत्रज्ञान व्यवस्थापक ए.पी. पेटे, कृषी सहायक डी.डी. राठोड, समूह सहायक कुलदीप थोरात, कृषिमित्र अभिलाष मोरे यांनी पुढाकार घेतला.