शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

गुडधी रेल्वे गेट राहणार तीन दिवस बंद; पर्यायी मार्गाचा वापर करन्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 15:26 IST

अकोला ते अमरावती या रेल्वे मार्गावर शहरानजीक गुडधी ग्रामपंचायतच्या हद्दीत रेल्वे गेट आहे.

अकोला :अकोला ते अमरावती या रेल्वे लाईनवर असलेल्या अकोला शहरानजीकचे गुडधी रेल्वे गेट शनिवारी दुपारी ३ वाजेपासून सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या मार्गावरील प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

अकोला ते अमरावती या रेल्वे मार्गावर शहरानजीक गुडधी ग्रामपंचायतच्या हद्दीत रेल्वे गेट आहे. या ठिकाणी दोन दिवस कामकाज चालणार असल्याने हे रेल्वे गेट प्रवाशांना  ये जा करण्यासाठी बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रवाशांना केले आहे. 

या रेल्वे गेट परिसरातून सांगळूद, धोतरडी, पळसो, दहिगाव गावंडे, कौलखेड, गाजीपुर, गोरेगाव, चिखली, मुर्तीजापुरकडे प्रवासी ये जा करतात; मात्र तीन दिवस आता हे गेट बंद राहणार असल्याने प्रवाशांनी उमरी परिसरातील इतर पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

टॅग्स :Akolaअकोलाrailwayरेल्वे