कॅन्सरग्रस्त महिलेच्या मदतीसाठी धावले पालकमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:25 IST2021-06-16T04:25:58+5:302021-06-16T04:25:58+5:30
अकाेला : मूर्तिजापूर तालुक्यातील दाळंबी येथील शाेभा मांडाेकार या कॅन्सरग्रस्त महिलेच्या उपचारासाठी त्यांचा मुलगा विक्की हा अकाेल्यात भीक मागून ...

कॅन्सरग्रस्त महिलेच्या मदतीसाठी धावले पालकमंत्री
अकाेला : मूर्तिजापूर तालुक्यातील दाळंबी येथील शाेभा मांडाेकार या कॅन्सरग्रस्त महिलेच्या उपचारासाठी त्यांचा मुलगा विक्की हा अकाेल्यात भीक मागून मदत गाेळा करत हाेताे, हे वृत्त ‘लाेकमत’ने प्रकाशित करताच मांडाेकार परिवाराच्या मदतीसाठी दातृत्वाचे शेकडाे हात समाेर आले आहे. अकाेल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनीही साेमवारी संध्याकाळी शाेभा मांडाेकार यांची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदतीसह शासकीय याेजनांचा तात्काळ लाभ दिला.
पालकमंत्री बच्चू कडू यांच्या समवेत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी साेमवारी संध्याकाळी तुकाराम हाॅस्पिटलमध्ये जाऊन शाेभा मांडाेकार यांची भेट घेतली. त्यांना संजय गांधी निराधार याेजनेत समावेश केल्याचे पत्र दिले. या याेजनेतून त्यांना दरमहा मदत केली जाईल, तसेच त्यांना अंत्याेदय याेजनेतील रेशन कार्डही तात्काळ देण्यात आले. यावेळी बच्चू कडू यांनी रुग्णालय प्रशासनाला या महिलेवर हाेणाऱ्या वैद्यकीय खर्चाबाबत त्यांच्याकडे मागणी करू नये, असे निर्देश दिले. तसेच संबंधित तहसीलदारांना या महिलेला घरकूल याेजनेतून घर देण्याबाबतही कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.