अकोल्यात ‘रिचार्ज शाप्ट’द्वारे भूजल पुनर्भरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 01:42 PM2018-06-08T13:42:05+5:302018-06-08T13:42:05+5:30

अकोला : अपुऱ्या पावसामुळे अकोला शहरावर जलसंकट कोसळले असून, शहराला पाणी पुरवठा करणाºया काटेपूर्णा प्रकल्पातील मृत जलसाठा उचलण्याची वेळ आली आहे.

Groundwater recharge by 'recharge shapt' in Akola | अकोल्यात ‘रिचार्ज शाप्ट’द्वारे भूजल पुनर्भरण

अकोल्यात ‘रिचार्ज शाप्ट’द्वारे भूजल पुनर्भरण

Next
ठळक मुद्देशहरातील विविध भागांमध्ये भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविला जात आहे. पावसाच्या पाण्याचे ‘रिचार्ज शाप्ट’द्वारे पुनर्भरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. राज्यात प्रथमच शहरी भागामध्ये अकोला महापालिका क्षेत्रात हा उपक्रम सुरू आहे.

अकोला : अपुऱ्या पावसामुळे अकोला शहरावर जलसंकट कोसळले असून, शहराला पाणी पुरवठा करणाºया काटेपूर्णा प्रकल्पातील मृत जलसाठा उचलण्याची वेळ आली आहे. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, पावसाच्या पाण्याचे ‘रिचार्ज शाप्ट’द्वारे पुनर्भरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, शहरातील विविध भागांमध्ये भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविला जात आहे. विशेष म्हणजे, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा ग्रामीण भागात हा उपक्रम राबविते; मात्र राज्यात प्रथमच शहरी भागामध्ये अकोला महापालिका क्षेत्रात हा उपक्रम सुरू आहे.
राज्य शासनाने पाणी टंचाई निवारणार्थ अकोला शहराकरिता नवीन विंधन विहिरीकरिता निधी मंजूर केला आहे, याकरिता सर्वेक्षण करीत असताना भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने अतिशय कमी कालावधीत सर्वेक्षण तर केलेच; पण पुनर्भरणासाठी रिचार्ज शाप्ट (पुनर्भरण स्तंभ) व जलभंजन करण्याचे महानगरपालिकेला सुचविले. महापौर विजय अग्रवाल व आयुक्त जितेंद्र वाघ यांना ही संकल्पना आवडल्याने त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळेच भूजल विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड व उपसंचालक डॉ. प्रवीण कथने यांच्या मार्गदर्शनात सहा. भूवैज्ञानिक प्रवीण बर्डे यांनी शहराची पाहणी करून महानगरपालिका क्षेत्रात ५० जलभंजन व ४०० रिचार्ज शाप्टसाठी जागा निश्चित केल्या. या कामास महापालिकेने तत्काळ निधी उपलब्ध करून दिल्यामुळे कामाला सुरुवात झाली आहे. शहरातील रामदासपेठ उमरी, न्यू तापडिया नगर, मनकर्णा प्लॉट, देशमुख फैल, मोहता मिल परिसर, सिंधी कॅम्प, जठारपेठ येथे रिचार्ज शाप्ट तयार करण्यात आले आहेत.


सिटी कोतवाली परिसरात घेतली चाचणी!
सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस रिचार्ज शाप्ट तयार केले असून, त्याच्या भूस्तराची क्षमता चाचणी घेण्यात आली असता रिचार्ज शाप्टने ५००० लीटर पाणी ३० मिनिटांत शोषून घेतले. त्यावेळी महापौर विजय अग्रवाल, आयुक्त जितेंद्र वाघ तसेच वरिष्ठ भूवैज्ञानिक रवींद्र शेलार, सहा. भूवैज्ञानिक प्रवीण बर्डे व भूसवियंचे कर्मचारी उपस्थित होते.

 

Web Title: Groundwater recharge by 'recharge shapt' in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.