शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

उपसा वाढला; भूजल पातळी दोन मीटरने घटली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 13:29 IST

अकोला : भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये सात तालुक्यांमधील भूजल पातळीत घट झाल्याचे निष्पन्न झाले असून, या तालुक्यांमध्ये आगामी काळात पाणीटंचाईचे संकट आणखी गंभीर होण्याची चिन्हे आहेत.

अकोला : भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये सात तालुक्यांमधील भूजल पातळीत घट झाल्याचे निष्पन्न झाले असून, या तालुक्यांमध्ये आगामी काळात पाणीटंचाईचे संकट आणखी गंभीर होण्याची चिन्हे आहेत.यावर्षी जिल्ह्यामध्ये परतीचा पाऊस झाला नसल्याने भूजल पातळीत समाधानकारक वाढ झाली नाही. त्यामुळे मार्च महिन्यापासून पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. सर्वसाधारणपणे सप्टेंबर महिन्यापर्यंत पावसाळा होतो. या काळात झालेल्या पावसावर भूजल पातळी जानेवारी महिन्यापर्यंत स्थिर राहते; परंतु यावर्षी परतीचा पाऊस झाला नाही. पावसाळ्यातील संपूर्ण दोन महिने कोरडे गेले. परिणामी, भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात सात तालुक्यांमधील भूजल पातळीत घट नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये टंचाईची स्थिती आणखी गंभीर झाली आहे. पाणी जिरविण्याशिवाय गत्यंतर नाही!महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या सर्वेक्षणानुसार, आपण जे जमिनीतील पाणी वापरतो, ते ५० ते १०० वर्षे अगोदर जमिनीत जिरलेले असू शकते. जमिनीत पाणी जिरताना १०० फूट खोलानंतर एक फूट खाली जाण्यासाठी पाण्याला चार महिने (१२० दिवस) लागतात. यावरून जमिनीत पाणी खोल जाण्याची कल्पना येऊ शकते. नैसर्गिक स्रोत हाच एकमेव पर्याय असल्याने पाणी किती आणि कसे वापरावे, याचा विचार प्रत्येकाने केल्याशिवाय गत्यंतर नाही. अशी आहे तालुकानिहाय घटतेल्हारा तालुक्यामध्ये पाणी पातळीत तब्बल ३.०७ मीटरने घट झाली आहे. बाळापूर तालुक्यात २.५३, अकोटमध्ये ४.५९, पातूरमध्ये १.८६, मूर्तिजापूर मध्ये १.४४ तर अकोला तालुक्यामध्येही पाणी पातळीत मोठी घट आहे. या तालुक्यात ०.२२ मीटर पाणी पातळीत घट आहे. ८१ विहिरींचे केले निरीक्षण!भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यातील भूजल पातळीची नोंद घेण्यासाठी एकूण ८१ विहिरींचे निरीक्षण केले. मार्च २०१९ मध्ये घेतलेल्या नोंदीनुसार आता जिल्हाभरात पाणी पातळीत झपाट्याने घट होत असून, दोन मीटरने घट नोंदविली आहे. कमी पर्जन्यमानाने भूगर्भात पाणी पातळीत वाढ झालेलीच नाही तसेच मोठ्या प्रमाणात वाढलेला उपसाही कारणीभूत आहे. येणाऱ्या काळात जलपुर्नभरण करावे लागणार आहे.- पी. पी. बर्डे, सहायक भूवैज्ञानिक,भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळ