अकोला येथे संत रविदास महाराज यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:20 IST2021-03-01T04:20:55+5:302021-03-01T04:20:55+5:30

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माणिकराव माने तर प्रमुख अतिथी म्हणून धनंजय धबाले नगरसेवक हे होते. पाहुण्यांच्या हस्ते गुरू रविदासांच्या प्रतिमेचे ...

Greetings to Saint Ravidas Maharaj at Akola | अकोला येथे संत रविदास महाराज यांना अभिवादन

अकोला येथे संत रविदास महाराज यांना अभिवादन

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माणिकराव माने तर प्रमुख अतिथी म्हणून धनंजय धबाले नगरसेवक हे होते.

पाहुण्यांच्या हस्ते गुरू रविदासांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी धबाले यांनी

नवनिर्माण समाजासाठी गुरू रविदासांचे विविध महत्त्वाचे आहेत. निर्विकार सत्य वचन म्हणजे गुरू रविदासांची वाणी होय. असे सांगितले तर अध्यक्षस्थानावरून बाेलताना माने यांनी गुरू रविदास महाराजांच्या विचाराचा अंगीकार आपल्या जीवनाचा कायापालट करू शकतो असे प्रतिपादन केले. संचालन डॉ. गजानन डोईफोडे यांनी तर आभार हरीष उंबरकर यांनी मानले.

कार्यक्रमाला नरेंद्र चिमणकर, गोपाल धबाले, केशव उंबरकर, सचिन वानेडकर, आदित्य शेकोकार, सुरेश इंगळे, शरद डामरे, राहुल पाचुरकर, नंदु ढाकरे, अजय पदमणे, ॲड. शेषराव गव्हाळे, सचिन डांगे, प्रफुल्ल उंबरकर, अविनाश चंदन, विजय देऊळकर उपस्थित होते.

Web Title: Greetings to Saint Ravidas Maharaj at Akola