सूतकताई करून महात्मा गांधींना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:15 IST2021-02-05T06:15:48+5:302021-02-05T06:15:48+5:30
गांधीजींच्या विधायक विचारातून कार्यकर्त्यांना जगण्याचे बळ मिळते, असे मत छात्र युवा संघर्ष वाहिनीचे कार्यकर्ते जयकृष्ण वाकोडे यांनी व्यक्त केले. ...

सूतकताई करून महात्मा गांधींना अभिवादन
गांधीजींच्या विधायक विचारातून कार्यकर्त्यांना जगण्याचे बळ मिळते, असे मत छात्र युवा संघर्ष वाहिनीचे कार्यकर्ते जयकृष्ण वाकोडे यांनी व्यक्त केले. सूतकताई केल्याने शेतकरी कष्टकरी बांधवाच्या श्रमाप्रती कृतज्ञता व्यक्त होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ सर्वोदयी महादेवराव भुईभार यांनी केले. सूतकताई करुन खादी वापरु इच्छिणाऱ्यांसाठी जिल्हा सर्वोदय मंडळ प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी चरखा कार्यशाळा घेणार असल्याची माहिती सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड यांनी अध्यक्षीय भाषणातून दिली.
कार्यक्रमाचे संचालन डाॅ.मिलिंद निवाणे यांनी केले. आभार प्रदर्शन महेश आढे यांनी केले. यावेळी अनिल मावळे, नितीन भरणे केळीवेळी,रामदास शेळके,अंबादास वसु,उमेश बंडुजी गाडगे,श्रीकृष्ण माळी,रोहित तारकस, उमा झुनझुनवाला,रामभाऊ रोडे यांनी सूतकताई यज्ञात सहभाग घेतला.
सर्वधर्म प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.