लोतखेड येथे महामानवाला अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:14 IST2020-12-09T04:14:40+5:302020-12-09T04:14:40+5:30

वरूर जऊळका येथे कडकडीत बंद वरूर जऊळका: शेतकऱ्यांच्या आंदोलनाला वरूर जऊळका येथील व्यापारी, शेतकऱ्यांनी पाठिंबा देत, कडकडीत बंद पाळला. ...

Greetings to Mahamanwala at Lotkhed | लोतखेड येथे महामानवाला अभिवादन

लोतखेड येथे महामानवाला अभिवादन

वरूर जऊळका येथे कडकडीत बंद

वरूर जऊळका: शेतकऱ्यांच्या आंदोलनाला वरूर जऊळका येथील व्यापारी, शेतकऱ्यांनी पाठिंबा देत, कडकडीत बंद पाळला. बस स्टॅन्डवरील हॉटेल, दुकाने बंद ठेवून शेतकऱ्यांच्या बंदला समर्थन दर्शविले. त्यामुळे बस स्टँड परिसरात शुकशुकाट होता.

आंदोलनासाठी लोतखेड येथील शेतकरी दिल्लीला रवाना

लोतखेड: कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी दिल्ली येथे सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लोतखेड येथील शेकडो शेतकरी मंगळवारी वाहनांनी दिल्लीला रवाना झाले.

वरूर जऊळका येथून जवळच असलेल्या लोतखेड येथील शेतकरी बांधवांनी प्रहार मोर्चात सहभागी होऊन दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या एल्गार मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष व पालकमंत्री बच्चू कडू यांच्यासोबत मोर्चामध्ये सहभागी होऊन दिल्लीला शेतकरी पोहोचले आहेत. यामध्ये शेतकरी व लोतखेड गावचे सरपंच कुलदीप वसु, माजी सरपंच निखिल गावंडे, कदीर शहा, शुभम कडू, अभिषेक कडू, अरविंद काळे, किशोर ईपर, घनश्याम कडू, सागर कडू, चेतन कडू, विकी कडू, राजदीप वसु, सर्वेश कडू, सोपान वसु, प्रवीण आवारे आदी सहभागी झाले.

फाेटाे:

Web Title: Greetings to Mahamanwala at Lotkhed