पिंजर पोलीस स्टेशनमध्ये बाबासाहेबांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:18 IST2021-04-16T04:18:10+5:302021-04-16T04:18:10+5:30

निहिदा: पिंजर पोलीस स्टेशनमध्ये महामानव डाॅ़ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली़ कोरोनाच्या पृष्ठभूमीवर घटनेचे ...

Greetings to Babasaheb at Pinjar Police Station | पिंजर पोलीस स्टेशनमध्ये बाबासाहेबांना अभिवादन

पिंजर पोलीस स्टेशनमध्ये बाबासाहेबांना अभिवादन

निहिदा: पिंजर पोलीस स्टेशनमध्ये महामानव डाॅ़ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली़ कोरोनाच्या पृष्ठभूमीवर घटनेचे शिल्पकार डाॅ़ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली़ पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार महादेवराव पडघान, पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गावंडे, टाऊन जमादार राजू वानखडे, पाणी फाऊंडेशनचे संघपाल वाहूरवाघ आदींनी डाॅ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले़ जमादार राजू वानखडे यांनी गीत सादर केले़ कार्यक्रमाला पि, एस, आय, करुणा माहुरे, पो, कॉ, सतीश कथे, अभिजित सिरसाट, हे काॅ, अशोक देशमुख, श्रीकांत आचलसाडे, हे, कॉ, रमेश पाटील खंडारे, प्रीती भगत, योगिता जाधव, संतोष हिराळकर, पो, कॉ मुकेश जाधव, पाणी फाउंडेशनचे संघपाल वाहूरवाघ,सामाजिक कार्यकर्ते ऍड, महेश घनगाव आदी उपस्थित होते़

Web Title: Greetings to Babasaheb at Pinjar Police Station