अकोल्यात प्रथमच आढळला ‘ग्रे हेडेड लॅपविंग’
By Admin | Updated: May 9, 2016 02:18 IST2016-05-09T02:18:20+5:302016-05-09T02:18:20+5:30
कुंभारीच्या तलावावर मुक्काम : ‘वेक्स’च्या पक्षी अभ्यासकांनी घेतली नोंद.

अकोल्यात प्रथमच आढळला ‘ग्रे हेडेड लॅपविंग’
अकोला: पूवरेत्तर चीन आणि जपान येथे मूळ अधिवास असलेला ह्यग्रे हेडेड लॅपविंगह्ण अर्थात राखाडी डोक्याचा टिटवी हा दुर्मीळ पक्षी अकोला जिल्हय़ात प्रथमच आढळून आला. परतीच्या प्रवासादरम्यान हा पक्षी अकोला शहरानजीकच्या कुंभारी तलावावर काही दिवसांसाठी मुक्कामी थांबला आहे. 'वाइल्ड लाइफ अँन्ड इनव्हायर्नमेंट कन्झर्व्हेशन सोसायटी', अमरावती (वेक्स)च्या पक्षी अभ्यासकांनी गुरुवार, ५ डिसेंबर रोजी या पक्ष्याची नोंद घेतली असून, हा पक्षी जिल्हय़ात प्रथमच दिसून आल्याचा दावा ह्यवेक्सह्णचे पक्षी अभ्यासक शिशिर शेंडोकार यांनी केला आहे.
हिवाळय़ात अनेक देशांमधील विविध प्रजातीचे पक्षी भारतात स्थलांतर करतात. देशभरातील पाणवठय़ांवर विविध पक्षी आढळून येतात. हिवाळा संपला की विदेशी पक्षी परतीच्या प्रवासाला निघतात. मार्च महिन्यापर्यंत त्यांचा हा परतीचा प्रवास सुरू असतो. दक्षिण भारतात स्थलांतर करून गेलेले पक्षी एप्रिल व मे महिन्यात परतीच्या प्रवासात निघतात.
या परतीच्या प्रवासादरम्यान ते विदर्भावरून जातात. यावेळी अकोला, अमरावती जिल्हय़ांमध्ये या पक्ष्यांना बघण्याची संधी पक्षी निरीक्षकांना मिळते. अमरावती येथील ह्यवेक्सह्णचे पक्षी अभ्यासक गत चार वर्षांपासून विदेशी पक्ष्यांच्या परतीचा अभ्यास करीत आहेत. ह्यवेक्सह्णचे अकोला येथील पक्षी अभ्यासक शिशिर शेंडोकार व मंगेश तायडे यांना कुंभारी तलावावर राखाडी डोक्याचा टिटवी पक्षी आढळून आला. या दोघांनी या दुर्मीळ पक्ष्याची छायाचित्रेही घेतली आहेत.
भारतात आढळणार्या टिटवी या पक्ष्याच्या प्रजातीचा असलेला हा ग्रे हेडेड लॅपविंग अत्यंत रुबाबदार पक्षी आहे. त्याचा मानेपासून डोक्यापर्यंतचा रंग राखाडी असतो. चोच व पाय पिवळेधम्म असून, चोच काळी असते. छातीवर काळय़ा रंगाचा कॉलरसारखा पट्टा असून, पुढे शेपटीपर्यंत पोटाखालचा भाग पांढरा असतो. पंखांचा रंग गर्द तपकिरी असून, शेपटीचे टोक काळे असते. या पक्ष्याचे शास्त्रीय नाव व्हेनेलस सिनेरिअस असे आहे.
विदर्भात पहिली नोंद भंडार्यात
हा पक्षी विदर्भात पहिल्यांदा भंडारा जिल्हय़ातील झिलमिली तलावावर २0१0 मध्ये आढळला होता. त्यानंतर अमरावती जिल्हय़ात २0१२ मध्ये या पक्ष्याची नोंद घेतल्या गेली. २0१५ मध्ये वर्धा जिल्हय़ातही तो आढळला होता. अकोला जिल्हय़ातही प्रथमच नोंद असल्याचे ह्यवेक्सह्णचे सचिव तथा मानद वन्यजीव रक्षक डॉ. जयंत वडतकर यांनी सांगितले.