‘सूक्ष्म खाद्य उद्योग’ योजनेमध्ये १९१ जणांना मिळणार अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:14 IST2021-06-26T04:14:13+5:302021-06-26T04:14:13+5:30

या योजनेंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योगासाठी तसेच सामाईक पायाभूत सुविधा केंद्रासाठी ३५ टक्के अनुदान, ब्रँडिंग व मार्केटिंगसाठी एकूण खर्चाच्या ५० ...

Grants will be given to 191 people under the 'Micro Food Industries' scheme | ‘सूक्ष्म खाद्य उद्योग’ योजनेमध्ये १९१ जणांना मिळणार अनुदान

‘सूक्ष्म खाद्य उद्योग’ योजनेमध्ये १९१ जणांना मिळणार अनुदान

या योजनेंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योगासाठी तसेच सामाईक पायाभूत सुविधा केंद्रासाठी ३५ टक्के अनुदान, ब्रँडिंग व मार्केटिंगसाठी एकूण खर्चाच्या ५० टक्के अनुदान स्वयंसाहाय्यता गटांना बीज भांडवल तसेच लहान उपकरणे खरेदीसाठी ४० हजार प्रती सभासद याप्रमाणे ४ लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक संघ, शेतकरी उत्पादक कंपनी, संस्था, स्वयंसाहाय्यता गट आणि सहकारी उत्पादक तसेच शासन यंत्रणा किंवा खासगी उद्योग इत्यादी घटकांना लाभ घेता येईल. सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या अन्न प्रक्रिया प्रकल्पांच्या विस्तारीकरणासाठी स्थरवृद्धी, आधुनिकीकरण या प्रकल्पांचे प्रस्तावदेखील या योजनेमध्ये सादर करता येतील. या योजनेत १० लाख रुपयांपर्यंत अनुदान प्राप्त होते.

असा आहे लक्ष्यांक

या योजनेसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी १६०, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी २८ व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ३ असा एकूण १९१ प्रकल्पांचा लक्ष्यांक प्राप्त झाला आहे. तर २ अर्जांवर प्रक्रिया पूर्ण झाली असून अनुदानासाठी बँकांकडे वर्ग केले आहे.

हरभरा पिकासाठी निवड

या योजनेंतर्गत जिल्ह्यात हरभरा या पिकाची निवड झाली आहे. यामध्ये केंद्र व राज्य शासन मिळून अनुदान देत आहे. लाभार्थींचा १० टक्के स्वहिस्सा असणे आवश्यक आहे. अर्जाची प्रक्रिया ऑनलाइन आहे.

Web Title: Grants will be given to 191 people under the 'Micro Food Industries' scheme