शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

घनकचऱ्यावर प्रक्रिया न केल्यास अनुदान बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 12:44 IST

अकोला: स्वच्छ भारत अभियानच्या धर्तीवर राज्यात राबविल्या जाणाऱ्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानातील ‘कचरा लाख मोलाचा’ मोहिमेकडे महापालिकांसह नगर परिषदांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे.

अकोला: स्वच्छ भारत अभियानच्या धर्तीवर राज्यात राबविल्या जाणाऱ्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानातील ‘कचरा लाख मोलाचा’ मोहिमेकडे महापालिकांसह नगर परिषदांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. कचºयाचे विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेला महापालिकांनी अद्यापही सुरुवात केली नसल्याची परिस्थिती आहे. या दरम्यान, नगर विकास विभागाने महापालिकांना कचºयाच्या विलगीकरणासाठी ३१ मार्चची मुदत दिली असून, कचºयावर प्रक्रिया करणाºया प्रकल्पांची उभारणी न केल्यास अनुदान बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.२ आॅक्टोबर २०१४ पासून देशभरात सुरू झालेल्या स्वच्छ भारत अभियानच्या पहिल्या टप्प्यात शहरांना हगणदरीमुक्त करण्याचे महापालिकांना उद्दिष्ट होते. २०१७ मध्ये राज्यातील सर्व शहरे हगणदरीमुक्त झाल्याचे राज्य शासनाने घोषित केल्यानंतर दुसºया टप्प्यात कचºयाची शास्त्रोक्त पद्वतीने विल्हेवाट लावण्याचे शासनाचे निर्देश आहेत. शहरात निर्माण होणाºया कचºयाचे ओला व सुका असे विलगीकरण करण्यासाठी मे २०१७ पासून ‘कचरा लाख मोलाचा’ मोहीम राबविण्याचे शासनाचे निर्देश होते. ३० जून २०१८ पर्यंत कचºयाचे विलगीकरण न केल्यास महापालिकांचे अनुदान बंद करण्याचा इशारा नगर विकास विभागाने दिला होता. शासनाच्या निर्देशाला वेळोवेळी केराची टोपली दाखवत महापालिका, नगरपालिकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. कचºयाच्या विलगीकरणासाठी स्वायत्त संस्थांना वारंवार प्रवृत्त करणाºया नगर विकास विभागाने ३१ मार्चपर्यंत कचºयावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी मुदत दिली आहे.पोर्टलवर नोंदीच नाहीत!घनकचºयाचे ओला व सुका असे वर्गीकरण केल्यानंतर त्यापासून कंपोस्ट खत तयार करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. कचºयापासून तयार होणाºया कंपोस्टबाबत केंद्र शासनाच्या पोर्टलवर नोंद करणे बंधनकारक होते. पोर्टलवर प्राप्त नोंदीनुसारच केंद्राकडून संबंधित महापालिकांना अनुदान दिले जाणार होते. कचºयावर प्रक्रियाच होत नसल्याने पोर्टलवर नोंदणी होत नसल्याचे चित्र आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका