पात्र शाळांना अनुदान द्या

By Admin | Updated: November 30, 2014 00:46 IST2014-11-30T00:46:22+5:302014-11-30T00:46:22+5:30

खासगी प्राथमिक शिक्षक संघाचे धरणे.

Grant to eligible schools | पात्र शाळांना अनुदान द्या

पात्र शाळांना अनुदान द्या

अकोला : शिक्षकांच्या अनेक मागण्या प्रलंबित असून, त्या सोडविण्यात याव्या, या मागणीसाठी राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघाने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. यावेळी जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात शिक्षकांनी जून २0१३ नंतर विविध शासन निणर्याद्वारे अनुदानास पात्र ठरवलेल्या राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना अनुदानाचे वितरण करावे.तसेच अनुदानाकरिता ऑनलाइन मूल्यांकन केलेल्या व जिल्हा तसेच विभागीय पातळीवर अनुदानास पात्र ठरलेल्या विनाअनुदानित शाळांना कुठल्याही फेरतपासणीशिवाय अनुदानास पात्र ठरवावे, या मागण्या करण्यात आल्या आहेत. धरणे आंदोलनात मनीष गावंडे, मो. अतिकउर रहेमान, मो. जावेदुजम्मा, मोहम्मद वसीम मुजाहीद, मोहम्मद शोइबोद्दीन, अमोल वानखडे, संतोष गावंडे, गजानन देशमुख, शेख समीर, अजय इंगोले, फैयाज अहमद, तारासिंग राठोड, मो. जाबीद, इफरोद्दीन, अ.निसार, मोहम्मद फैय्याज, तारीक खान, मुजतबा अली, असलम अहेमद खान, सै. इमदाद अली, नसिमउल्लाह खान, मोबीन खान, दत्ता घोंगे, सुदर्शन भिसे, प्रवीण भरकड, शेख साबीर, मनीषा कार्वेकर, प्रवीण ठाकरे, राहुल कोरडे, आशिष शर्मा आदी शिक्षक सहभागी झाले होते.

Web Title: Grant to eligible schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.