आजीने अनुभवला जीवन मरणाचा थरार; २० तास अडकून होती नदी पात्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2022 17:06 IST2022-07-23T17:06:53+5:302022-07-23T17:06:58+5:30
Grandmother experienced the thrill of life and death : दर्शनासाठी आलेली आजी पुर्णा नदीच्या काठावर असलेल्या घावरु पाय घसरल्याने दुथडी भरुन वाहात असलेल्या पुर्णेच्या प्रवाहात वाहत गेली.

आजीने अनुभवला जीवन मरणाचा थरार; २० तास अडकून होती नदी पात्रात
-संजय उमक
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : तालुक्याच्या सीमेवर असलेल्या ऋणमोचन येथे भाविकांची मुद्गलेश्र्वराच्या दर्शनासाठी नेहमीच गर्दी होत असते, मुद्गलेश्र्वराच्या दर्शनासाठी आलेली आजी पुर्णा नदीच्या काठावर असलेल्या घावरु पाय घसरल्याने दुथडी भरुन वाहात असलेल्या पुर्णेच्या प्रवाहात वाहत गेली; मात्र दैव बलवत्तर म्हणून तिला २० तासानंतर वाचविण्यात ऐंडली च्या युवकांना यश आले. ६७ वर्षे वयाच्या आजीने त्या रात्री जीवन मरणाचा थरार अनुभवला.
त्याचे असे झाले की, अकोला जिल्ह्यातील आपोती येथील ६७ वर्षीय वत्सलाबाई शेषराव राणे या २१ जुलै रोजी भातकुली येथील बहिणीच्या मुलाकडे जात असताना वाटेतच असलेल्या ऋणमोचन येथील मुद्गलेश्र्वराच्या दर्शनासाठी त्या बस मधून उतरल्या, मुद्गलेश्र्वराचे दर्शन घेऊन (पयोष्णी) पुर्णा नदीच्या दर्शनासाठी व जवळ असलेला प्रसाद विसर्जनासाठी त्या आजीबाई घटावर उतरत असताना अचानक पाय घसरल्याने त्या थेट नदी पात्रात पडल्या, नदीला मोठ्या प्रमाणात पुर असल्याने त्या प्रवाहात वाहत असल्याचे तेथे उपस्थित एका तरुणाच्या लक्षात येतातच त्याने आजीला वाचविण्याचे शर्तीचे प्रयत्न केले परंतु पाण्याला प्रचंड खळखळाट असल्याने तो त्याला ठिकाणी आजीला वाचविण्यात अपयश आले. ४ वाजता पासून नदीत वाहून गेलेली आजी नागरीकांनी शोधून पुन्हा दिसलीच नाही.
आजी जिवंत असल्याच्या आशा संपल्या होत्या
२१ जुलै रोजी ४ वाजता वाहून गेलेली आजी आता जिवंत मिळणार नाही, तशी आशाच उरली नसल्याने तिचा मृतदेह नदीत वाहून जाणार आहे. तिचा मृतदेह वाहून आला तर तो आपण पकडू यासाठी ऐंडली येथील पुलावर बसून तिच्या मृतदेहाची नागरिक रात्री ९ वाजेपर्यंत बसले, परंतु काहीच हाती आले नसल्याने आता आजी जिवंत नाही तिचा मृतदेह वाहून गेला असावा अशी धारणा नागरीकांची झाली होती.
असा अनुभवला जीवन मृत्यू चा थरार
२१ जुलै रोजी दुपारी ४ वाजता वाहून गेलेली आजीच्या हातात काही अंतरावरच पुराच्या पाण्यात असले झुडूप लागले, तिने तेव्हा पासून तर २२ जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत ते धरुन ठेवले, ती किर्र अंधारी रात्र आजीने जीव मुठीत धरून पाण्यातच काढली, दुसऱ्या दिवशी शेतात जाणाऱ्या काही नागरिकांनां आजीने हाक दिली तेव्हा आजी नदीतच अडकून पडली असून ती जिवंत असल्याने मूर्तिजापूरात असलेल्या ऐंडली येथील युवकांना बोलावून आजीला सुखरूप बाहेर काढण्यात आले.