शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लढवय्यी... आजीने अनुभवला जीवन-मरणाचा थरार; २० तास अडकून हाेती पुरात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 05:24 IST

६७ वर्षीय आजीने अख्खी रात्र काढली नदी पात्रात : युवकांनी वाचविले प्राण

संजय उमक मूर्तिजापूर (जि. अकाेला) : तालुक्याच्या सीमेवरील ऋणमोचन येथे मुद्गलेश्वराच्या दर्शनासाठी आलेल्या आजीचा पूर्णा नदीच्या काठावरील घाटावरून पाय घसरून त्या पूर्णेच्या प्रवाहात वाहत गेल्या; मात्र दैव बलवत्तर म्हणून आजीला २० तासानंतर वाचविण्यात यश आले. ६७ वर्षे वयाच्या आजीने त्या रात्री जीवन-मरणाचा थरार अनुभवला. अख्खी रात्र नदी पात्रात त्यांनी जागून काढली.  

आपोती येथील वत्सलाबाई शेषराव राणे या २१ जुलै रोजी भातकुली येथील बहिणीच्या मुलाकडे होत्या. वाटेतच मुद्गलेश्वराच्या दर्शनासाठी त्या थांबल्या. प्रसाद विसर्जनासाठी घाटावर उतरताना पाय घसरल्याने त्या थेट नदीपात्रात पडल्या. नदीच्या प्रवाहात त्या वाहत असल्याचे एका युवकाच्या लक्षात आले. त्याने आजीला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले.

संपल्या हाेत्या आशा! २१ जुलै रोजी ४ वाजता वाहून गेलेली आजी आता जिवंत मिळणार, याची आशाच उरली नव्हती. त्यामुळे मृतदेह वाहून आला तर तो आपण पकडू, यासाठी ऐंडली येथील पुलावर बसून मृतदेहाची नागरिक रात्री वाट पाहत बसले हाेते. 

पुराच्या पाण्यातील झुडूप पकडून मृत्यूला परतवलेआजीच्या हातात काही अंतरावरच पुराच्या पाण्यातील झुडूप लागले. तिने तेव्हापासून तर २२ जुलै रोजी दुपारी १२ पर्यंत ते धरून ठेवले. ती किर्र अंधारी रात्र आजीने जीव मुठीत धरून पाण्यातच काढली. दुसऱ्या दिवशी शेतात जाणाऱ्या काही नागरिकांना आजीने हाक दिली. तेव्हा आजी नदीतच अडकून पडली असून, ती जिवंत असल्याने ऐंडली येथील युवकांना बोलावून आजीला सुखरूप बाहेर काढले.

 

टॅग्स :AkolaअकोलाfloodपूरRainपाऊस