नातवाने केली आजोबाची हत्या
By Admin | Updated: April 7, 2015 02:05 IST2015-04-07T02:05:38+5:302015-04-07T02:05:38+5:30
संपत्तीच्या वादातून केली हत्या.

नातवाने केली आजोबाची हत्या
अकोला: संपत्तीच्या वाट्यावरून सुरू असलेल्या वादातून नातवाने आजोबा व सावत्र आजीवर कुर्हाडीने वार केले. यात आजोबा जागीच गतप्राण झाले, तर आजी गंभीर जखमी झाली. ही घटना रविवारी मध्यरात्री २.३0 वाजताच्या सुमारास अमानतपूर ताकोडा गावामध्ये घडली असून, सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. डाबकी रोड पोलिसांनी आरोपीला अटक केली. डाबकी रोड पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या अमानतपूर ताकोडा येथे राहणारे गोविंदा धनुजी मोरे (७0) हे त्यांची तिसरी पत्नी आशाबाई मोरे (६0) हिच्यासह राहत होते. सोमवारी सकाळी गावातील एक महिला त्यांच्या घरी गेली. यावेळी मोरे दाम्पत्य अंगणामध्ये रक्ताच्या थारोळय़ात पडलेले दिसून आले. ही माहिती पोलीस पाटीलांना दिल्यावर, त्यांनी डाबकी रोड पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून गंभीर जखमी आशाबाई मोरे हिला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात भरती केले. गोविंदा मोरे यांचा जागीच मृत्यू झाल्याने त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. पोलिसांच्या त पासामध्ये मृतक गोविंदा मोरे आणि त्यांचा नातू सचिन वाल्मीक खंडारे यांच्यात संपत्तीवरून वाद सुरू होता. रविवारी मध्यरात्रीदरम्यान त्याचे आजोबा गोविंदा मोरे व सावत्र आजी आशाबाई हे गाढ निद्रेत असताना आरोपी सचिनने त्यांचेवर कुर्हाडीने वार केले. यात मोरे जागीच गतप्राण झाले, तर आजी आशाबाई गंभीर जखमी झाली. पोलिसांनी तातडीने आरोपी सचिन खंडारे याला गजाआड केले.