गुणपत्रिकेऐवजी आता ग्रेडपत्रिका!
By Admin | Updated: December 10, 2014 00:06 IST2014-12-10T00:06:13+5:302014-12-10T00:06:13+5:30
विद्यापीठ अनुदान आयोगाचा निर्णय

गुणपत्रिकेऐवजी आता ग्रेडपत्रिका!
अकोला : गुणांची जीवघेणी स्पर्धा थांबावी आणि विद्यार्थ्यांना निसंकोचपणे पुढे जाता यावे, यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने आता गुणपत्रिकेऐजवी ग्रेडपत्रिका देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील सुचना आयोगाने सर्व विद्यापीठांना केल्या असून, त्यानुसार विद्यार्थ्यांना यापुढे गुणवत्तेनुसार ग्रेड देण्यात येणार आहेत.
शालेयस्तरावर विद्यार्थ्यांमध्ये सुरु असलेली जीवघेणी स्पर्धा थांबविण्यासाठी ग्रेड पद्धती सुरु करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर विद्यापीठस्तरावर शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांनादेखील ग्रेड पद्धती देण्याचा विचार विद्यापीठ अनुदान आयोगाने केला आहे. गुण पद्धतीमध्ये एखादा जरी गुण कमी मिळाला तरी विद्यार्थ्यांंची मानसिकता ढासळते. अनेकवेळा निराशेच्या गर्तेत गेलेले विद्यार्थी टोकाची भूमिका घेऊन आत्महत्येसारखा मार्गदेखील निवडतात. त्यामुळेच सर्व विद्यार्थ्यांना समान पातळीवर आणण्यासाठी गुणांकन पद्धती बदलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. पाश्चात्य देशांमध्ये विद्यार्थ्यांसाठी ह्यक्रेडिट बेस्ट सिस्टिमह्णआहे, आता त्याच धर्तीवर ह्यचॉईस बेस्ट मार्कींग सिस्टिमह्ण लागू करण्यात येत आहे.
चॉईस बेस्ट मार्कींग सिस्टिममध्ये विद्यापीठांतर्गत पदवी, पदव्युत्तर पदवी, डिप्लोमा व सर्टिफिकेट कोर्स हे अभ्यासक्रम शिकणार्या विद्यार्थ्यांंना सेमिस्टरनंतर ग्रेड सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. याचा उद्देश प्रत्येक सेमिस्टरमध्ये ठरवलेले विषय त्याच कालावधीत शिक्षकांनी शिकविणे व त्याचे विद्यार्थ्यांना योग्य आकलन करुन देणे, हा आहे. ग्रेड पद्धती लागू झाल्यानंतर परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही. विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार ग्रेड दिले जाणार असून, त्यासाठी १0 पॉईंटची ग्रेड पद्धती ठरविण्यात आली आहे.
अशा राहतील ग्रेड
ए प्लस - एक्सलन्ट
ए ग्रेड - व्हेरी गुड
बी प्लस- गुड
सी - पास
एफ - नापास