पर्यावरण सप्ताहात वृक्षारोपणाचा ग्रामपंचायतचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:13 IST2021-06-11T04:13:38+5:302021-06-11T04:13:38+5:30
अडगाव बु. : पर्यावरण दिनानिमित्त ग्रामपंचायत अडगाव बु. पर्यावरण सप्ताह साजरा करीत असून झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाचा समतोल ...

पर्यावरण सप्ताहात वृक्षारोपणाचा ग्रामपंचायतचा उपक्रम
अडगाव बु. : पर्यावरण दिनानिमित्त ग्रामपंचायत अडगाव बु. पर्यावरण सप्ताह साजरा करीत असून झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाचा समतोल राखा असा संदेश देत वृक्षारोपणाचा उपक्रम राबवित आहे. सरपंच शोभा खंडारे यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण सप्ताहात अंतर्गत स्थानिक पूर्वा कॉलनीतील गाडगेबाबा विचार केंद्र परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी गटनेता संजय राजनकर, उपसरपंच मजहर अली, माजी सरपंच अशोक घाटे, डॉ. गुलाम नबी, ग्रा. पं. सदस्य सुनील वानखडे, मकसूद अली, आकाश अनोकार, अजमत अली, रमेश खंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामपंचायततर्फे पर्यावरण सप्ताहानिमित्त प्लास्टिक बंदी, जल शुद्धिकरण, वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. गाडगेबाबा विचार केंद्र परिसरात झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमास अरुण सोनोने, आत्माराम जाधव, मनोहर तायडे, ज्ञानेश्वर ढोरे, राजेश चव्हाण, सुनील कळसकर, अमोल इंगोले, अंकुश ढोकणे उपस्थित होते.
फोटो: