ग्रामपंचायत सदस्यांनाच शौचालयाचा विसर
By Admin | Updated: February 11, 2015 01:14 IST2015-02-11T01:14:05+5:302015-02-11T01:14:05+5:30
मेहकर तालुक्यात ग्रा.पं.च्या ३२३ सदस्यांकडे शौचालय नाही.

ग्रामपंचायत सदस्यांनाच शौचालयाचा विसर
रफिक कुरेशी /मेहकर (बुलडाणा): मेहकर तालुक्यात ९८ ग्राम पंचायममध्ये ८५६ सदस्य असून, यापैकी ५३३ ग्रा.पं. सदस्यांनीच पंचायत समितीकडे शौचालय असल्याचा अहवाल जमा केला आहे. त्यामुळे तालुक्यातील ३२३ ग्रामपंचायत सदस्यांकडेच शौचालय नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
स्वच्छता अभियान वाढविण्यासाठी १ एप्रिल २0१२ रोजी संपूर्ण स्वच्छता अभियानाचे निर्मल भारत अभियान असे नामकरण करण्यात आले. याअंर्तगत शौचालय बांधण्यासाठी ४ हजार ६00 व रोहयोमधून ४ हजार ५00 रुपये अनुदान देण्यात येत होते. आता ७ नोव्हेंबर २0१४ रोजी राज्य शासनाने एक परिपत्रक काढून वैयक्तिक शौचालय बांधणार्या कुटुंबाला केंद्रशासनाकडून ९ हजार व राज्य शासनाकडून ३ हजार असे एकूण १२ हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. शासनाने राज्यातील ग्रामपंचायत सदस्य व इतर संबंधित कर्मचार्यांकडे शौचालय बांधणे बंधनकारक केले आहे.
मेहकर तालुक्यात ९८ ग्रामपंचायती असून, ८५६ ग्रामपंचायत सदस्य आहे त. यापैकी ५३३ ग्रा.पं. सदस्यांनीच पंचायत समितीकडे शौचालय असल्याचा अहवाल जमा केला आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्राम पंचायतच्या ३२३ सदस्यांकडेच शौचालय नसल्याचे निर्दशनास आले आहे. यावरून आजही अनेक ग्रामपंचायत सदस्यांकडे शौचालय नसल्याने शासनाच्या नियमाला मूठमाती दिली जात असल्याचे दिसते.
यासंदर्भात गटविकास अधिकारी गजानन पाटोळे यांनी ज्या सदस्यांकडे शौचायलय नाही त्यांना शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त करुन तालुका १00 टक्के हगणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न असल्याचे लोकमतशी बोलताना सांगीतले.