बार्शीटाकळी तालुक्यात ग्रामगीता प्रचार गाव बैठक अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:41 IST2021-09-02T04:41:10+5:302021-09-02T04:41:10+5:30

कान्हेरी सरप येथील बैठकीदरम्यान श्री गुरुदेव सेवा मंडळाचे तालुका युवक प्रमुख प्रा. योगेश सरप, राष्ट्रधर्म युवा मंचचे तालुकाध्यक्ष अंकुश ...

Gram Gita Prachar Gaon Baitak Abhiyan in Barshitakali taluka | बार्शीटाकळी तालुक्यात ग्रामगीता प्रचार गाव बैठक अभियान

बार्शीटाकळी तालुक्यात ग्रामगीता प्रचार गाव बैठक अभियान

कान्हेरी सरप येथील बैठकीदरम्यान श्री गुरुदेव सेवा मंडळाचे तालुका युवक प्रमुख प्रा. योगेश सरप, राष्ट्रधर्म युवा मंचचे तालुकाध्यक्ष अंकुश लोथे यांच्या पुढाकाराने कान्हेरी सरप येथील जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले. त्यानंतर गोरव्हा येथे प्रचार बैठक झाली. अभियानामध्ये जिल्हा प्रचारप्रमुख डॉ. अशोक रत्नपारखी, तालुका प्रचारप्रमुख देवीदास कावरे, तालुका सेवाधिकारी संतोष सोनोने, राष्ट्रीय कीर्तनकार श्रीकृष्ण सावळे, आर. आय. शेख गुरुजी, कृषीभूषण मधुकरराव सरप, ज्येष्ठ मार्गदर्शक हरिदासजी रत्नपारखी, तुळशीरामजी बोबडे, भीमराव गावंडे, श्रीकृष्ण ठोंबरे, तालुका सरचिटणीस रविसिंग डाबेराव, केंद्रप्रमुख सुरेशराव सावरकर, धनंजय ढोरे, राजेश शिंदे, श्रीकृष्ण पांडे महाराज, पुरुषोत्तम महल्ले, दीपक लुंगे, सुनील भारसाकडे, जेठाभाई पटेल, प्रदीप गावंडे यांचा सहभाग आहे.

Web Title: Gram Gita Prachar Gaon Baitak Abhiyan in Barshitakali taluka