शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

विदर्भातील ज्येष्ठ प्रचारकांना ग्रामगीता जीवन गौरव पुरस्कार जाहीर

By atul.jaiswal | Published: November 13, 2017 3:44 PM

अकोला: संपूर्ण जीवन श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या कायार्ला वाहून घेतलेल्या नागपुर येथील ज्येष्ठ प्रचारक श्री दुगार्दासजी रक्षक, तळेगाव येथील रामकृष्ण अत्रे, अ. भा. श्रीगुरुदेव आश्रम गुरुकुंज ग्रामगिता जीवन परीक्षेचे सचिव गुलाबराव खवसे व नागपूर येथील रुपरावजी वाघ या चार ज्येष्ठ प्रचारकांना यंदाचा ग्रामगीता जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देदुगार्दास रक्षक, श्रीरामजी अत्रे महाराज, गुलाबराव खवसे, रुपरावजी वाघ यांचा समावेश

अकोला: संपूर्ण जीवन श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या कायार्ला वाहून घेतलेल्या नागपुर येथील ज्येष्ठ प्रचारक श्री दुगार्दासजी रक्षक, तळेगाव येथील रामकृष्ण अत्रे, अ. भा. श्रीगुरुदेव आश्रम गुरुकुंज ग्रामगिता जीवन परीक्षेचे सचिव गुलाबराव खवसे व नागपूर येथील रुपरावजी वाघ या चार ज्येष्ठ प्रचारकांना यंदाचा ग्रामगीता जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अकोला येथे नोव्हेंबर महिन्यात होणार असलेल्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.नागपुर येथील जेष्ठ प्रचारक दुगार्दासजी रक्षक बालपणापासून व राष्ट्रसंताच्या सहवासातून प्रचार कार्य करीत आहेत. त्यांनी आजीवन या कार्याला वाहून घेतले आहे. ज्ञानेश्वर रक्षक यांचे ते पिताश्री आहेत. रामकृष्ण अत्रे महाराज तळेगाव परिसरामध्ये मानव सेवा आश्रम द्वारे बाल संस्कार शिबिरांच्या माध्यमातून त्यांचे अविरत कार्य करीत आहेत. अ. भा. श्रीगुरुदेव आश्रम गुरुकुंज ग्रामगीता जीवन परीक्षेचे सचिव मा श्री गुलाबरवजी खवसे हे ग्रामगीता परीक्षा विभागातून विद्यार्थ्यांना परीक्षेला बसविण्याचे कार्य करीत आहेत.आजीवन प्रचारक म्हणून त्यांची ख्याती आहे. नागपूर येथील रुपरावजी वाघ नागपूर हे राष्ट्रसंताच्या समग्र साहित्यातून गुरुदेव सेवा करती आहेत. नवीन पुस्तके छापून अल्प दरात त्याचे वितरण करतात.अशा या कर्मयोग्यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रसंत विचार सहित्य समिती द्वारे ग्रामगीता जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यापूर्वी आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी, केशव दास रामटेके, सत्यपाल महाराज, आमले महाराज, तिमांडे महाराज, सुधाताई जवंजाड, मथुराबाइ नारखेडे इत्यादी विभूतींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिक