ग्रा.पं. निवडणूक; ६६ उमेदवारी अर्ज दाखल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:44 IST2017-09-19T00:44:38+5:302017-09-19T00:44:45+5:30
अकोला : जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसर्या दिवशी सोमवारी जिल्हय़ात ६६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यामध्ये सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी उमेदवारी अर्जांचा समावेश आहे. दरम्यान पितृपक्ष संपल्यानंतर गुरुवारपासून अर्ज भरण्याला गती येण्याचा अंदाज आहे.

ग्रा.पं. निवडणूक; ६६ उमेदवारी अर्ज दाखल!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसर्या दिवशी सोमवारी जिल्हय़ात ६६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यामध्ये सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी उमेदवारी अर्जांचा समावेश आहे. दरम्यान पितृपक्ष संपल्यानंतर गुरुवारपासून अर्ज भरण्याला गती येण्याचा अंदाज आहे.
आज सुटीच्या दिवशीही दाखल करता येतील अर्ज!
मंगळवार, १९ सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावस्यानिमित्त जिल्हाधिकार्यांमार्फत जाहीर शासकीय सुटी असली, तरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ऑनलाइन उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी आस्तियकुमार पांडेय यांनी प्रसिद्धीस दिले आहे.