बाश्रीटकाळी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अद्यापही फरार

By Admin | Updated: June 30, 2014 01:53 IST2014-06-30T00:47:28+5:302014-06-30T01:53:05+5:30

देयकासाठी दृष्टीबाधित शिक्षकाला मागितली लाच

Govt. Officials of the Bashrttali Panchayat Samiti are still absconding | बाश्रीटकाळी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अद्यापही फरार

बाश्रीटकाळी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अद्यापही फरार

अकोला: सर्वशिक्षा अभियानांतर्गत दृष्टीबाधित व अपंग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमावरील खर्चाचे देयक मंजूर करण्यासाठी ३000 रुपयांची लाच मागणारा बाश्रीटाकळी पंचायत समितीमधील गटशिक्षणाधिकारी अद्यापही फरारच आहे.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत दृष्टीबाधित व अपंग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उ पक्रमासाठी विशेष शिक्षक म्हणून संजय मुळे मानधनावर कार्यरत आहेत. दृष्टीबाधित व अपंग विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्यासाठी विविध शैक्षणिक उ पक्रम राबविले जातात. गेल्या वर्षभरामध्ये बार्शिटाकळी पंचायत समिती स्तरावर संजय मुळे यांनी विविध शैक्षणिक उपक्रम घेतले. या उपक्रमांवर झालेल्या खर्चाचे देयक त्यांनी गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत नथ्थुआप्पा पस्तापुरे यांच्याकडे सादर केले; परंतु लाचखोरीची लागण झालेल्या पस्तापुरे याने या अंध शिक्षकाकडे देयक मंजूर करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागितली; परंतु मुळे यांनी स्पष्ट शब्दात पस्तापुरे याला नकार दिला. परंतु तरीही पस्तापुरे हा लाच देण्यासाठी मुळे यांच्यावर दबाब टाकीत होता. अखेर संजय मुळे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २४ जून रोजी पंचायत समिती कार्यालयात सापळा लावला. संजय मुळे हे पैसे घेऊन गटशिक्षणाधिकारी पस्तापुरे याच्याकडे गेले असता त्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात येण्याचे सांगितले. या ठिकाणीही मुळे गेले; परंतु गटशिक्षणाधिकारी पस् तापुरे याला संशय आल्याने तो पसार झाला. लाच मागितल्यानुसार बार्शिटाकळी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला
**सेवानवृत्त होणार असताना लावला बट्टा
गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत पस्तापुरे हा ३0 जून रोजी सेवानवृत्त होणार आहे; परंतु सेवानवृत्त होण्याच्या तीन-चार दिवसांपूर्वीच त्याने स्वत:वर लाचखोर असल्याचा बट्टा लावून घेतला. चंद्रकांत पस्तापुरे यांची कारकीर्द तशी वादग्रस्तच आहे. लाच घेतल्याशिवाय त्यांनी कोणतीही कामे केली नाहीत. लाच घेणे हा त्याने गोरखधंदाच बनविला होता. या गोरखधंद्याच्या जोरावर त्याने अमाप माया जमविल्याचे शिक्षण विभागात बोलल्या जात आहे. एका अंध शिक्षकाला मदत करण्याऐवजी गटशिक्षणाधिकारी पस्तापुरे याने लाच मागून आपल्या माणुसकीला काळिमाच फासला. त्याला अटक करून त्याच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी बार्शिटाकळी येथील शिक्षकांनी केली.

Web Title: Govt. Officials of the Bashrttali Panchayat Samiti are still absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.