शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

शिधापत्रिका : शासनाच्या दुतोंडी भूमिकेने पुरवठा विभागाची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 11:02 AM

शासनाच्या या दुतोंडी भूमिकेने पुरवठा विभाग कमालीचा कोंडीत सापडला, तर शिधापत्रिकांच्या तपासणीमध्ये लाभार्थींची पिळवणूक करण्याची संधीही यानिमित्ताने दुकानदार, यंत्रणेला मिळाली आहे.

- सदानंद सिरसाटअकोला : दुचाकी, चारचाकीधारक, जमीन मालकांच्या शिधापत्रिकांची तपासणी करून त्या रद्द करण्याचा आदेश पुरवठा यंत्रणेला देण्यात आला. येत्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तो अंगलट येण्याची चिन्हे दिसताच अन्न व नागरी पुरवठा विभागाने १७ जुलै रोजी परिपत्रक प्रसिद्ध करीत शिधापत्रिका रद्द करण्याचा कोणताही निर्णय शासनाने घेतला नसल्याचे म्हटले. त्याचवेळी ५ नोव्हेंबर १९९९ रोजीच्या शासन निर्णयानुसार निकषात न बसणाºया शिधापत्रिका तत्काळ अपात्र करण्याचाही आदेश दिला. शासनाच्या या दुतोंडी भूमिकेने पुरवठा विभाग कमालीचा कोंडीत सापडला, तर शिधापत्रिकांच्या तपासणीमध्ये लाभार्थींची पिळवणूक करण्याची संधीही यानिमित्ताने दुकानदार, यंत्रणेला मिळाली आहे.सार्वजनिक वितरण प्रणालीतून धान्य वाटपाच्या योजनेत पात्र ठरण्यासाठी दुचाकी, चारचाकी, जमीन मालकी हक्काबाबत लाभार्थींनी दिलेल्या माहितीची पडताळणी करून त्यांच्या शिधापत्रिका रद्द करण्याचा आदेश १३ जून २०१९ रोजी देण्यात आला. या निर्णयाविरोधात प्रचंड ओरड झाली. तसेच विधानसभा निवडणुकीचे घोडामैदान जवळच असल्याने वाढता जनक्षोभ राज्यातील सत्ताधारी पक्षासाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे निर्माण झाली. त्यामुळे १७ जुलै रोजी शासनाने तसा निर्णय घेतला नाही, असे परिपत्रक काढावे लागले. त्याच परिपत्रकात शिधापत्रिकांची तपासणी मोहीम सतत सुरूच ठेवावी, त्यामध्ये निकषानुसार पात्र नसलेल्या शिधापत्रिका रद्द करण्याचेही म्हटले. त्यासाठी ५ नोव्हेंबर १९९९ रोजीच्या शासन निर्णयानुसार धान्याच्या लाभासाठी पात्रतेचे निकष ठरलेले आहेत. त्यानुसार पडताळणी करण्याचे बजावले. ते निकष पाहता दुचाकी, चारचाकीधारक, जमीन मालक धान्याच्या लाभासाठी अपात्र ठरणार, हे निश्चित. दुचाकी, चारचाकीधारक, मोठ्या शेतकऱ्यांनी धान्याचा लाभ मिळण्यासाठी दिलेल्या माहितीची पडताळणी केली जाईल. त्यामध्ये वाहनधारकांची माहिती परिवहन विभाग, तर जमीन मालकीची माहिती महसूल विभागाकडून घेतली जाणार आहे. पिवळ्या, केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी अपात्रताधान्याच्या लाभासाठी शासन निर्णयातील अपात्रतेच्या निकषामध्ये पिवळ्या शिधापत्रिकेसाठी कुटुंबातील कोणतीही व्यक्ती डॉक्टर, वकील, स्थापत्य विशारद, चार्टर्ड अकाउंटंट असेल, कुटुंबातील कोणतीही व्यक्ती व्यवसाय कर, विक्री कर किंवा आयकर भरण्यास पात्र असेल, कुटुंबात निवासी दूरध्वनी असेल, यांत्रिक दुचाकी, चारचाकी वाहन असेल, घरगुती स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी असेल, कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या नावे एकूण दोन हेक्टर जिरायत किंवा एक हेक्टर हंगामी बागायत किंवा अर्धा हेक्टर बारमाही बागायत असल्यास ते कुटुंब अपात्र ठरणार आहे.केशरी शिधापत्रिकेसाठी चारचाकी वाहन, चार हेक्टर जमीन किंवा त्यापेक्षा अधिक बारमाही बागायती जमीन असू नये, हे निकष आहेत. या निकषानुसार पुरवठा विभागाला पडताळणी करावी लागणार आहे, तर शिधापत्रिका रद्द होणार नाहीत, असा आव शासनाने आणला आहे. या प्रकाराने निवडणुकीच्या तोंडावर शासनाने दुतोंडी भूमिका घेतली आहे. त्याचा सामना आता पुरवठा यंत्रणेला करावा लागणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार