शहरं
Join us  
Trending Stories
1
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
2
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
3
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
4
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
5
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
6
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
7
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
8
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
9
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
10
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
11
अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
12
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
13
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
14
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
15
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
16
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
17
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
18
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
19
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

व्यापारी, उद्योजकांच्या समस्यांचे निराकरण करण्यावर सरकारचा भर -  शाहनवाज हुसेन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 1:53 PM

अकोला : व्यापारी, उद्योजकांच्या समस्यांचे निराकरण करू न त्यांना दिलासा देण्यावर केंद्र सरकारचा भर असून, राज्याच्या पातळीवर ई-वे बिलाची मर्यादा एक लाख रुपयापर्यंत वाढविण्यासाठी सरकारकडे प्रयत्न करू असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय  प्रवक्ता शाहनवाज हुसेन यांनी शनिवारी येथे केले.

ठळक मुद्देविदर्भ चेंबर आॅफ कामर्स इंडस्ट्रिजच्या ८४ व्या वार्षिक आमसभेला उपस्थित राहण्यासाठी शाहनवाज हुसेन येथे आले होते. व्यापारी, उद्योजक भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा असतो, तो याहीवेळी उभा राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.चेंबरशी निगडित व्यापारी, उद्योजक, पदाधिकारी, सभासदांची उपस्थिती होती.

अकोला : व्यापारी, उद्योजकांच्या समस्यांचे निराकरण करू न त्यांना दिलासा देण्यावर केंद्र सरकारचा भर असून, राज्याच्या पातळीवर ई-वे बिलाची मर्यादा एक लाख रुपयापर्यंत वाढविण्यासाठी सरकारकडे प्रयत्न करू असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय  प्रवक्ता शाहनवाज हुसेन यांनी शनिवारी येथे केले.विदर्भ चेंबर आॅफ कामर्स इंडस्ट्रिजच्या मराठा मंडळ सभागृहात आयोजित ८४ व्या वार्षिक आमसभेला उपस्थित राहण्यासाठी शाहनवाज हुसेन येथे आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष विजय पानपालिया होते. या सभेला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावकर, आमदार गोपीकिशन बाजोरिया, माजी खासदार अजय संचेती, महापौर विजय अग्रवाल, राजकुमार बिलाला, निकेश गुप्ता, अशोक डालमिया, वसंत बाछुक  आदींची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना हुसेन यांनी व्यापारी, उद्योजकांच्या विविध मागण्या व प्रश्न सोडविण्यावर सरकारचा भर असून, जीएसटीबाबत ई-वे बिलांची ५० हजार रुपयांची मर्यादा आता एक लाख रुपये करण्यात येण्यासाठी आपले प्रयत्न आहेत. या राज्यातील व्यापारी, उद्योजकांच्या समस्या आपण सरकारपुढे मांडणार असल्याचे ते म्हणाले. ई-वे बिलासह त्यांनी स्थानिक औद्योगिक वसाहतीला कायमस्वरू पी पाणी पुुरवठा होण्यासाठी अमृत योजनेतून हा प्रश्न सोडविण्यासाठीची उद्योजकांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी भाजपाचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. तसेच अकोल्याच्या विमानतळाचा विस्तार होण्यासाठी आपले खास प्रयत्न असतील, असेही त्यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी दिल्लीहून जेवढा वेळ अकोल्याला येण्यासाठी लागला, तेवढ्या वेळेत मी विमानाने इंग्लंडला पोहोचलो असतो, असे म्हणताच सभागृहात प्रचंड हशा पिकला. या विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण करून, ते सुरू करणे क्रमप्राप्त असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. व्यापारी, उद्योजक भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा असतो, तो याहीवेळी उभा राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.सभेला चेंबरचे पदाधिकारी नितीन खंडेलवाल, कासमअली नानजीभाई, विवेक डालमिया, निरजंन अग्रवाल, रवी खंडेलवाल, रमाकांत खेतान, श्रीकर सोमण, शशिकांत खेतान, सुधीर राठी, ओमप्रकाश गोयनका, प्रकाशभय्या, प्रभाकर गावंडे, ज्ञानप्रकाश खंडेलवाल, गोविंद बजाज, राहुल गोसर, राहुल गोयनका, निरव वोरा, दिलीप खत्री, कृष्णकुमार राठी, सतीश बालचंदाणी, गोपाल अग्रवाल, कृष्णा शर्मा, किशोर बाछुका, प्रमोद खंडेलवाल, आशिष चंदराणा, रूपेश राठी, अ‍ॅड. सुभाषसिंग ठाकूर, निखिल अग्रवाल, नितीन पाटील, कुंजबिहारी जाजू, पंकज बियाणी यांच्यासह चेंबरशी निगडित व्यापारी, उद्योजक, पदाधिकारी, सभासदांची उपस्थिती होती.

 

टॅग्स :AkolaअकोलाVidarbha Chamber of Commerceविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स