कापसाला अग्रिम बोनस देण्यावर शासन अनुकूल

By Admin | Updated: November 24, 2014 00:02 IST2014-11-24T00:02:39+5:302014-11-24T00:02:39+5:30

कृषिमंत्री एकनाथ खडसे यांचा कापूस उत्पादकांना दिलासा; बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी कठोर पावले.

Government subsidy to give advance bonus to cotton | कापसाला अग्रिम बोनस देण्यावर शासन अनुकूल

कापसाला अग्रिम बोनस देण्यावर शासन अनुकूल

राजरत्न सिरसाट/अकोला
यंदा कापसाचे उत्पादन घटले हे खरे असून, कापसाला मिळणारे हमीदर प्रतिक्विंटल ४0५0 रुपयांपर्यंतच आहेत. त्यामुळे कापसाला अग्रिम बोनस देण्यासाठी राज्य शासन अनुकूल असल्याची माहिती राज्याचे महसूल तथा कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांनी रविवारी येथे दिली.
ना. खडसे अकोला दौर्‍यावर आले असताना त्यांनी शेतकर्‍यांप्रती असलेली शासनाची भूमिका खास ह्यलोकमतह्णशी बोलताना स्पष्ट केली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे भाव पडले असल्याने देशांतर्गत कापसाच्या भावावर त्याचे परिणाम जाणवत आहेत. शेतकर्‍यांचा कापूस बाजारात कमी भावाने विकला जात आहे. याच पृष्ठभूमीवर शासनाने तातडीने निर्णय घेत, कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाद्वारे राज्यात हमी दराने कापूस खरेदी केंद्रं सुरू केली आहेत. या केंद्रांद्वारे हमी भावाने कापसाची खरेदी केली जात असली तरी शासन शेतकर्‍यांच्या बाजूने असल्यानेच कापूस उत्पादक शेतकर्‍यांना अग्रिम बोनस देण्याबाबत अनुकूल असून, याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करणार असल्याचे ना. खडसे यांनी सांगितले.
सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. गतवर्षीची अतवृष्टी आणि यावर्षी झालेला कमी पाऊस, यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. या शेतकर्‍यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचारविनिमय केला जाणार असून, बोगस सोयाबीन बियाणे विक्रीला प्रतिबंध घालण्यासाठी शासनाकडून कठोर पावले उचलण्यात येत असून, याबाबत कायदाच तयार केला जाणार आहे. शेतकर्‍यांना अशा पद्धतीने गंडविणार्‍यांची गय केली जाणार नसल्याचे सांगून, यापुढे बोगस बियाणे विकण्यावर फौजदारी स्वरू पाचे गुन्हे दाखल करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात हजारो शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापुढे शेतकर्‍यांवर आत्महत्येसारखा प्रसंग ओढवूच नये, यासाठी शासन प्रयत्नशील असून, शेतकर्‍यांसाठी अनेक उपाययोजना राबविण्यात येतील. कृषी विभागाच्या योजना शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत नव्हे, तर शेतात कशा पोहोचतील, यावर जोर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
फोटो : २४ सीटीसीएल 0७

Web Title: Government subsidy to give advance bonus to cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.