गोवंशासाठी शासनाने विशेष अनुदान द्यावे
By Admin | Updated: January 14, 2015 01:13 IST2015-01-14T01:13:37+5:302015-01-14T01:13:37+5:30
राधाकृष्ण महाराज यांची विनवणी

गोवंशासाठी शासनाने विशेष अनुदान द्यावे
अकोला : गोवंशाचे रक्षण होणे ही काळाची गरज आहे. गाय ही केवळ एका धर्माशी जोडणे चुकीचे असून, गायीचे आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. गोवंश रक्षणासाठी केवळ कागदावर कायदे करून उपयोगाचे नाही, तर शासनाने विशेष अनुदान दिले पाहिजे, अशी आर्त विनवणी राजस्थानच्या पथमेडा गोधाम येथून आलेले राधाकृष्ण महाराज यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केली.
श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञात विचारपुष्प गुंफण्यासाठी आलेले राधाकृष्ण महाराज यांनी गोरक्षणाच्या दृष्टीने आपली मते पत्रकरांजवळ व्यक्त केली. आम्ही काही लोक मिळून एक छोटेसे गोधाम चालवतो. इथे हजारो गायींसह गोवंशांचे संवर्धन, रक्षण आणि पालन केले जाते. हेच काम शासनदेखील करू शकते; परंतु त्यासाठी गोहत्या प्रतिबंधक कायदा केला म्हणजे झाले, अशाने होणार नाही. शासनाला त्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. गोवंशासाठी विशेष अनुदान शासनाने द्यावे सोबतच गोहत्या करणार्यांविरोधात कडक कारवाईची तजवीज करावी. पोलिसांना विशेष निर्देश द्यावेत. स्वतंत्र गोपालन मंत्रालय स्थापन करावे, असे मत राधाकृष्ण महाराज यांनी व्यक्त केले.