शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
2
NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक
3
तालिबानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान संतापला, भारतावर केला गंभीर आरोप
4
अखेरपर्यंत साथ! सुनेच्या पार्थिवावर डोकं ठेवून सासूने जगाचा घेतला निरोप; हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ
5
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
6
"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर
7
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
9
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
10
ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली
11
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
12
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
13
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
14
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
15
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
16
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
17
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
18
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
19
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
20
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन

शासकीय कार्यालयाचे कामकाज आता व्हॉट्सअ‍ॅपवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 10:24 IST

शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ५ जून रोजी सर्वच विभागांना निर्देश दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : संपूर्ण जगात झपाट्याने प्रसार झालेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आता शासकीय कार्यालयातील कामकाज ई-मेल, व्हॉट्स अ‍ॅप मेसेजद्वारे करून त्याला मान्यता दिली जाणार आहे. त्यासाठी शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ५ जून रोजी सर्वच विभागांना निर्देश दिले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग शासकीय कार्यालयांमध्ये होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केंद्र व राज्य शासनाकडून केल्या जात आहेत.सद्यस्थितीत कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती, तसेच भविष्यातील परिस्थिती पाहता सामान्य प्रशासन विभागाने संबंधितांना घरी राहूनच कार्यालयीन कामकाजाचा आवश्यकतेनुसार निपटारा करण्याच्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी ई-मेल, व्हाट्स अ‍ॅपचा वापर शासकीय कामकाजासाठी ग्राह्य धरला जाणार आहे. या पद्धतीनुसार काम करताना अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काय करावे, याबाबतचे निर्देशही देण्यात आले आहेत. शासकीय कार्यालयातील प्रत्येक अधिकारी-कर्मचाºयांनी त्यांचे शासकीय ई-मेल आयडी, त्यांच्या नेहमीच्या वापरातील अन्य ई-मेल आयडी, तसेच एसएमएस, व्हॉट्स अ‍ॅपची सुविधा असलेला मोबाइल क्रमांक कार्यालय प्रमुखांना द्यावा लागणार आहे. शासकीय कामकाजासाठी त्याचा वापर करीत कामाचा जास्तीत जास्त निपटारा करावा लागणार आहे. कामकाजाबाबतचा प्रस्ताव मेलद्वारे पाठविल्यानंतर त्याची माहिती एसएमएसद्वारे संबंधितांना द्यावी लागेल.वरिष्ठांच्या सूचनेनुसार अंतिम मान्यतेसाठी प्राप्त प्रस्ताव तो सादर करणारे व अंतिम मान्यता देणारे, या दोन्ही स्तरामधील अधिकाºयांनी तो पाहिला, तपासला व मान्य केला, असे गृहीत धरले जाणार आहे.प्रस्ताव तयार करणाºया अधिकारी-कर्मचाºयांनी तो सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून द्यावा लागणार आहे. शासनाकडून पुढील निर्देश मिळेपर्यंत या पद्धतीने कामकाजाला मंजुरी देण्यात आली आहे. त्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्तांनाही विशेषत: कामकाजाबाबत निर्देश दिले आहेत.शासकीय कार्यालयातील प्रत्येक अधिकारी-कर्मचाºयांनी त्यांचे शासकीय ई-मेल आयडी, त्यांच्या नेहमीच्या वापरातील अन्य ई-मेल आयडी, तसेच एसएमएस, व्हॉट्स अ‍ॅपची सुविधा असलेला मोबाइल क्रमांक कार्यालय प्रमुखांना द्यावा लागणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपEmployeeकर्मचारी