शासकीय कापूस खरेदी यंदा आॅक्टोबरमध्ये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 01:50 PM2019-09-27T13:50:47+5:302019-09-27T13:50:54+5:30

आॅक्टोबर महिन्याच्या पंधरवड्यात शासकीय कापूस खरेदी सुरू होण्याची शक्यता भारतीय कापूस (सीसीआय) महामंडळाने वर्तविली आहे.

Government cotton purchase in October this year! | शासकीय कापूस खरेदी यंदा आॅक्टोबरमध्ये!

शासकीय कापूस खरेदी यंदा आॅक्टोबरमध्ये!

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कापसाचे वाढलेले क्षेत्र व उत्पादनाची शक्यता बघता, यावर्षी आॅक्टोबर महिन्याच्या पंधरवड्यात शासकीय कापूस खरेदी सुरू होण्याची शक्यता भारतीय कापूस (सीसीआय) महामंडळाने वर्तविली आहे; परंतु यावर्षी उत्पादन पंधरा दिवस उशिरा येण्याची शक्यता महाराष्टÑ राज्य कापूस उत्पादन पणन महासंघाच्या सूत्राने वर्तविली असून,पणन महासंघ नोव्हेबंर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खरेदी केंद्र सुरू करणार आहे.
राज्यात यावर्षी ४१ लाख हेक्टरवर कपाशी पिकाची पेरणी झालेली आहे; परंतु पावसाच्या अनिश्चिततेमुळे मराठवाड्यात कापसावर परिणाम झाला आहे. असे असले तरी विदर्भात कपाशीचे क्षेत्र वाढले आहे. सुरुवातीला पावसाला विलंब झाल्याने पेरण्यांनाही तीन आठवडे विलंब झाला. पेरणीनंतरही तीन आठवडे पावसाचा खंड पडला; परंतु नंतर बऱ्यापैकी पाऊस आल्याने कपाशीचे पीक बहरले. तथापि, पुन्हा एक महिन्यापासून तुरळक स्वरू पाचा पाऊस सुरू आहे. सध्या कपाशीची स्थिती उत्तम आहे. उत्पादनही चांगले येण्याची शक्यता आहे. हे उत्पादन आॅक्टोबरऐवजी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे; परंतु त्यासाठी आता पाऊस थांबणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास चांगले आलेले उत्पादन हातचे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच अनुषंगाने ‘सीसीआय’ने आॅक्टोबरच्या पंधरवड्यात कापूस खरेदीचे नियोजन केले आहे. पणन महासंघ ‘सीसीआय’चा उपअभिकर्ता आहे. त्यामुळे सीसीआयने आॅक्टोबरमध्ये खरेदी केंद्र सुरू केल्यास पणन महासंघ नोव्हेंबर महिन्याच्या प्रथम आठवड्यात सुरू करणार असल्याचे पणन महासंघाच्या सूत्राने सांगितले.
दरम्यान, यावर्षी चार प्रकारचे कापसाचे हमीदर जाहीर करण्यात आले असून, कापसाची प्रत व धाग्याच्या लांबीनुसार हे दर मिळणार आहेत. प्रतिक्ंिवटल ५,४०० रुपये, ५,४५०, ५,५०० ते ५,५५० रुपये दर ठरले आहेत.

Web Title: Government cotton purchase in October this year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.