शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

संपकरी ‘एनएचएम’ कर्मचाऱ्यांना शासनाचा ४८ तासांचा अल्टिमेटम

By atul.jaiswal | Updated: May 11, 2018 16:55 IST

काम बंद आंदोलन पुकारणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण अभियान (एनएचएम)अंतर्गत आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाने कामावर रुजू होण्यासाठी ४८ तासांचा ‘अल्टिमेटम’ दिला आहे.

ठळक मुद्दे ४८ तासांत कामावर रुजू होण्यास सांगावे, न झाल्यास त्यांची सेवा समाप्त करण्यात यावी, अशा सूचना. अशोक वाटीका येथे धरणे आंदोलन करणाऱ्या ‘एनएचएम’ कर्मचाऱ्यांनी अभियान संचालकांच्या परिपत्रकाची होळी केली.कार्यवाहीचा अहवाल तातडीने सादर करावा, अशा सूचना १० मे रोजी काढलेल्या परिपत्रकात दिलेल्या आहेत.

अकोला : शासकीय सेवेत विनाशर्त समायोजन आणि समान काम-समान वेतन या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी ८ मे पासून पुन्हा बेमुदत काम बंद आंदोलन पुकारणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण अभियान (एनएचएम)अंतर्गत आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाने कामावर रुजू होण्यासाठी ४८ तासांचा ‘अल्टिमेटम’ दिला आहे. संपावर असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना ४८ तासांत कामावर रुजू होण्यास सांगावे, न झाल्यास त्यांची सेवा समाप्त करण्यात यावी, अशा सूचना आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांच्या कार्यालयातून राज्यभरातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (सीईओ)यांना एका पत्राद्वारे जारी करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या इशाऱ्यानंतरही एनएचएम कर्मचारी भूमिकेवर ठाम असून, मागण्या मान्य होईपर्यंत कामबंद आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज कडू व जिल्हा सचिव गोपाल अंभोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.राज्यभरातील ‘एनएचएम’ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १२ एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले होते. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी २१ एप्रिल रोजी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक होऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा अभ्यास आणि शिफारस करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते. समिती गठीत करण्याबाबतचा शासन निर्णय तीन दिवसांत काढणे अपेक्षित असताना शासनाकडून दिरंगाई होत असल्याचे पाहून संघटनेने ८ मे रोजी पुन्हा कामबंद आंदोलन सुरु केले. याची दखल घेत शासनाने त्याच दिवशी समिती गठीत करण्याचा शासन निर्णय काढला. या समितीची कार्यकक्षा व इतर बाबींमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ही समिती म्हणने केवळ फार्स असल्याचे सांगत संघटनेने आंदोलन सुरुच ठेवण्याचा भूमिका घेतली. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे आरोग्य विभागाचा कारभार विस्कळीत झाल्याचे पाहून शासनाने कठोर भूमिका घेतली. संपकरी कर्मचाºयांना ४८ तासाच्या आत कामावर रूजू करून घेण्यात यावे. कामावर रूजू न झाल्यास त्यांच्या सेवा समाप्त क रून नवीन पदभरती तात्काळ सुरू करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तातडीने सादर करावा, अशा सूचना १० मे रोजी काढलेल्या परिपत्रकात दिलेल्या आहेत.कर्मचाऱ्यांनी केली परिपत्रकाची होळीशासनाने संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्याचे आदेश जारी केल्यानंतर संघटनेनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. संपूर्ण मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचा निर्धार करीत येथील अशोक वाटीका येथे धरणे आंदोलन करणाऱ्या ‘एनएचएम’ कर्मचाऱ्यांनी अभियान संचालकांच्या परिपत्रकाची होळी केली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज कडू, सचिव गोपाल अंभोरे, सचिन उन्होने, पराग रेलकुंतलवार, सचिन पाटेकर, अमोल घोडे, प्रकाश कोल्हे, रमन लोखंडे, पंकज डिक्कर, परेश फिरके, अनिल जाधव यांच्यासह जिल्हाभरातील कंत्राटी एनएचएम कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शासनाच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला.

टॅग्स :AkolaअकोलाEmployeeकर्मचारीagitationआंदोलन