अट्टल चोरट्याकडून ७0 ग्रॅम सोने हस्तगत!

By Admin | Updated: July 8, 2016 02:24 IST2016-07-08T02:24:58+5:302016-07-08T02:24:58+5:30

खदान पोलिसांची कारवाई.

Got 70 grams of gold from intact thieves! | अट्टल चोरट्याकडून ७0 ग्रॅम सोने हस्तगत!

अट्टल चोरट्याकडून ७0 ग्रॅम सोने हस्तगत!

अकोला: केशव नगर चौकातून गत आठ दिवसांपूर्वी अमरावती येथील अट्टल चोरट्यास खदान पोलिसांनी अटक केली. पोलीस कोठडीमध्ये त्याची चौकशी केल्यानंतर त्याच्याकडून गुरुवारी ७0 ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले. अमरावती येथील रहिवासी भारत गुरुदासमल वासवानी या चोरट्यास आठ दिवसांपूर्वी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी लंपास करताना नागरिकांनी पकडले होते. त्यानंतर खदान पोलिसांनी या चोरट्यास अटक केली. गुन्हा दाखल करून त्याची चौकशी केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने सात ते आठ चोर्‍यांची कबुली दिली. त्यानंतर खदान पोलिसांनी भारत वासवानी यांच्याकडून गुरुवारी तब्बल ७0 ग्रॅम चोरीचे सोने जप्त केले आहे. आरोपीकडून आणखी सोने जप्त करण्यात येणार असल्याची माहिती खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार छगनराव इंगळे यांनी दिली.







 

Web Title: Got 70 grams of gold from intact thieves!