गोपीकिशन बाजोरिया यांच्याकडे अकोट मतदारसंघाची जबाबदारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 01:40 IST2017-11-28T01:36:12+5:302017-11-28T01:40:53+5:30

गेल्या काही दिवसांपासून अकोट मतदारसंघात आमदार गोपीकिशन  बाजोरिया यांच्या फेर्‍या वाढल्या असून, त्यांची पावले आता अकोट विधानसभा  मतदारसंघाकडे वळली असल्याची चर्चा राजकीय वतरुळात सुरू आहे. अशा तच आता त्यांच्याकडे अकोट विधानसभा मतदारसंघ बांधणीची जबाबदारी  शिवसेनेच्यावतीने दिली असल्याने या चर्चेला बळ मिळाले आहे. 

Gopikishan Bajoria's responsibility for Akot constituency! | गोपीकिशन बाजोरिया यांच्याकडे अकोट मतदारसंघाची जबाबदारी!

गोपीकिशन बाजोरिया यांच्याकडे अकोट मतदारसंघाची जबाबदारी!

ठळक मुद्देभाजपच्या ताब्यातील मतदारसंघात मोर्चेबांधणी राजकीय वतरुळात चर्चा सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : गेल्या काही दिवसांपासून अकोट मतदारसंघात आमदार गोपीकिशन  बाजोरिया यांच्या फेर्‍या वाढल्या असून, त्यांची पावले आता अकोट विधानसभा  मतदारसंघाकडे वळली असल्याची चर्चा राजकीय वतरुळात सुरू आहे. अशा तच आता त्यांच्याकडे अकोट विधानसभा मतदारसंघ बांधणीची जबाबदारी  शिवसेनेच्यावतीने दिली असल्याने या चर्चेला बळ मिळाले आहे. 
राज्यामध्ये सत्तेत असलेल्या भाजपा-शिवसेना या दोन पक्षातील शीतयुद्ध  कधीचेच संपले असून, हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात रणशिंग फुंकून  आगामी निवडणुकीची मार्चेबांधणी करीत आहेत. शिवसेनेने प्रत्येक विधानसभा  मतदारसंघनिहाय मोर्चेबांधणीसाठी जबाबदारी दिली असून, त्यामध्ये अकोट  विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आमदार गोपिकिशन बाजोरिया यांच्याकडे  सोपविली आहे. अकोट हा मतदारसंघ सध्या भाजपाकडे आहे. येथून भाजपाचे  ज्येष्ठ आमदार प्रकाश भारसाकळे यांनी मागील निवडणुकीत शिवसेनेसह  विरोधकांचा पराभव करून, विजयाचा झेंडा रोवला होता. जिल्हय़ातील सर्वात  मोठी नगरपालिका असलेल्या अकोट या मतदारसंघात भाजपाचा वरचष्मा  आहे. यापूर्वी येथे सेनेचे संजय गावंडे हे आमदार होते. त्यांच्या पराभवानंतर  सेनेच्या वर्चस्वाला उतरती कळा लागली. 
त्यामुळे आता पुन्हा नव्या दमाने सेना उभारणीसाठी संपर्कप्रमुख खा. अरविंद  सावंत यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मोर्चेबांधणीची जबाबदारी  निश्‍चित केली आहे. 
आ. बाजोरिया यांनी यापूर्वी अकोला पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढविली  होती. त्यामध्ये त्यांना भाजपाकडून निसटता पराभव पत्कारावा लागला. मात्र,  विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून तिसर्‍यांदा विजयी होत,  त्यांनी पक्षातील आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. 
गेल्या शुक्रवारीच अकोट नगर परिषदेच्या समस्यांबाबत प्रशासकीय  कामकाजाचा आढावा घेतला होता, तर अकोटकडे जाणार्‍या राज्य मार्गाच्या  दुरुस्तीसाठी अल्टिमेटम देऊन अकोट येथील जनतेच्या जिव्हाळय़ाच्या प्रश्नांना  हात घातला. तसेच अकोट शहरासाठी तयार केलेल्या विकास आराखड्यात  आवश्यक बदल करून, मुंबईत बैठक लावण्याचे आश्‍वासन आ. बाजोरिया  यांनी दिले. 
पुरवणी कर आकारणीमधील अपिलापासून वंचित राहिलेल्या  मालमत्ताधारकांना संधी देऊन त्यांचे आक्षेप निकाली काढण्याचे निर्देश मु ख्याधिकारी गीता ठाकरे यांना दिले. बाजोरिया यांचा अकोटमधील वाढता राब ता, सध्या राजकीय वतरुळात चर्चेचा विषय बनला आहे. अशातच आता  विधानसभा मोर्चेबांधणीची जबाबदारी त्यांच्यावर आल्याने पुढील विधानसभा  निवडणुकीची तयारी तर नव्हे ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

Web Title: Gopikishan Bajoria's responsibility for Akot constituency!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.