महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्याची सोनेरी संधी
By Admin | Updated: September 30, 2014 00:14 IST2014-09-30T00:01:24+5:302014-09-30T00:14:17+5:30
चिखली येथे नितीन गडकरी यांचे जाहीर सभेत प्रतिपादन.

महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्याची सोनेरी संधी
चिखली (बुलडाणा) : महाराष्ट्र ही संतांची, सुधारकांची आणि शूरवीरांची भूमी आहे; परंतु काँग्रेस व राष्ट्रवादीच्या दळभद्री राजकारणामुळे हे राज्य अधोगतीकडे चालले आहे. ही घसरण थांबवून महाराष्ट्राला पुन्हा विकासाच्या वाटेवर अग्रेसर करण्याची सोनेरी संधी या निवडणुकीच्या निमित्ताने आली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूतल वाह तूक व ग्रामीण विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
बुलडाणा जिल्ह्यातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ नितीन गडकरी यांची जाहीर सभा २९ सप्टेंबर रोजी चिखली येथे पार पडली. आघाडी सरकारला कायमचे िपछाडीवर टाकण्यासाठी व महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी भाजपाच्या नेतृत्वातील स्थिर सरकार निवडून आणण्याचे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले. सभेला ज्येष्ठ नेते आ.भाऊसाहेब फुंडकर, प्रदेश उपाध्यक्ष आ.चैनसुख संचेती, विधान परिषद सदस्य आ. डॉ.रणजीत पाटील, जिल्हाध्यक्ष आ. संजय कुटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अँड. विजय कोठारी, आकाश फुंडकर, सुरेशआप्पा खबुतरे, डॉ. गणेश मान्टे, डॉ. योगेंद्र गोडे, नरहरी गवई, शिवराज जाधव, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष शकुंतला बाहेकर, संजय चेके पाटील, श्वेताताई महाले यांची उपस्थिती होती.