आखातवाड्याच्या वृत्तिकाची स्वर्णिम कामगिरी
By Admin | Updated: November 18, 2014 23:07 IST2014-11-18T23:05:08+5:302014-11-18T23:07:36+5:30
४२ वी महाराष्ट्र राज्य जुदो अजिंक्यपद- २0१४ स्पर्धा, ३0 किलो वजनगटात प्रथम स्थान.

आखातवाड्याच्या वृत्तिकाची स्वर्णिम कामगिरी
अँड. नीलिमा शिंगणे /अकोला
उस्मानाबाद येथे झालेल्या ४२ व्या महाराष्ट्र राज्य जुदो अजिंक्यपद- २0१४ स्पर्धेत आखातवाडा येथील वृत्तिका रमेश ढगे हिने अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करीत ३0 किलो वजनगटात सब-ज्युनिअर गटात प्रथम स्थान पटकावित सुवर्णपदकावर ताबा मिळविला. वृत्तिकाच्या स्वर्णिम कामगिरीसाठी आयोजकांनी तिचा बेस्ट जुदोका पुरस्कार देऊन गौरव केला. मागील वर्षी वृत्तिकाने दिल्ली येथे झालेल्या ५९ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत १४ वर्षाखालील गटात जुदो प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत उत्कृष्ट प्रदर्शन केले. आखातवाडा या छोट्याशा गावात कोणतीही अत्याधुनिक क्रीडासुविधा नसताना वृत्तिकाने स्वबळावर सुवर्णपदकाचा वेध घेतला, हे येथे उल्लेखनीय आहे. याआधी तिने औरंगाबाद येथे जानेवारी २0१२ मध्ये झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत कांस्यपदक, नाशिक येथे ऑक्टोबर २0१२ मध्ये झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत परत कांस्यपदक, औरंगाबाद येथे २0१३ मध्ये झालेल्या राज्यस् तरीय स्पर्धेत पुन्हा कांस्यपदक आणि मुंबई येथे डिसेंबर २0१३ मध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. जानेवारी २0१४ मध्ये तिने महाराष्ट्राचे प्र ितनिधित्व करीत दिल्लीत अमरावती विभागाचे नाव झळकाविले. सप्टेंबर २0१४ मध्ये झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत पुन्हा एकदा सुवर्णपदक तिने कमाविले. सुवर्ण पदकासह बेस्ट जुदिका हा बहुमान मिळविला. ३१ ऑक्टोबर २0१४ रोजी नंदुरबार येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत वृत्तिकाला चांगले प्रदर्शन करूनदेखील कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. दर्यापूरातील रत्नाबाई राठी विद्यालयात आठव्या वर्गात शिकणार्या वृत्तिकाने अल्पवयातच स्वबळावर यशस्वी कामगिरी बजावली. ऑलिम्पिक स्पर्धेत भार ताचे प्रतिनिधित्व करण्याचे तिचे स्वप्न असून, त्यासाठी अधिकाधिक मेहनत करी त असल्याचे ह्यलोकमतह्णला तिने सांगितले. वृत्तिकाला सभ्यता स्पोर्ट्स क्लबचे प्रा. राजेंद्र पारडे, प्रफुल्ल खोडके, डॉ. आर. एस. पठाण, राजेंद्र राणे, उमेश पाटील यांच्यासह आई-वडील व आजी-आजोबा यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असते.