शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमधील चोरीचे सोने अकोल्यात विकण्याचा डाव; चोरट्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 15:50 IST

रायगड जिल्ह्यातील तीन घरफोड्यातील चोरी केलेले सोने विक्रीसाठी गांधी रोडवर असलेल्या एका अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी अटक केली.

अकोला: अकोल्यातील सराफा चोरीचे सोने खरेदी करण्यात विदर्भातच नव्हे तर थेट कोकणापर्यंत कुप्रसिद्ध असल्याचे वास्तव मंगळवारी समोर आले असून, रायगड जिल्ह्यातील तीन घरफोड्यातील चोरी केलेले सोने विक्रीसाठी गांधी रोडवर असलेल्या एका अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी अटक केली. त्याने सदरचे सोने गांधी रोडवरील एका सराफाला विकण्यासाठी आणल्याची कबुली पोलिसांना दिली असून, यावरून लोकमतने काही दिवसांपूर्वी प्रकाशित केलेल्या चोरट्या सराफांचे पितळ पुन्हा एकदा उघड झाले आहे.कोकणातील रायगड जिल्ह्यात तीन ठिकाणी मोठ्या चोऱ्या केल्यानंतर प्रसाद जगन्नाथ पाटील नामक २६ वर्षीय चोरटा या तीन चोरीतील सोने विक्री करण्यासाठी गांधी रोडवरील एका सराफाकडे आला होता. तीन चोऱ्यांमध्ये लाखो रुपयांचे सोने चोरी केल्यानंतर अर्ध्या किमतीमध्ये हे सोने खरेदी-विक्रीचा डाव रचण्यात आला; मात्र सदर चोरट्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख कैलास नागरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी चोरट्यावर पाळत ठेवली. या प्रकाराची कुणकुण सराफालाही लागल्याची माहिती असून, त्यामुळे गांधी रोडवरील या सराफाने सदर चोरट्यास मंगळवारी दुपारपर्यंत या परिसरात थांबवून ठेवले. तेवढ्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून सदर चोरटा प्रसाद पाटील यास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी करून झाडाझडती घेतली असता या चोरट्याकडून सुमारे ५० हजार रुपये किमतीचे १६ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात शेख हसन, अब्दुल मजीद, एजाज अहमद, अशोक चाटी, रवी इरचे यांनी केली. गांधी रोडवरील तो चोरटा सराफा कोण?गांधी रोडवर प्रतिष्ठित आणि नावाजलेल्या सराफांची प्रतिष्ठाने आहेत; मात्र रायगड जिल्ह्यातून चोरीचे सोने विक्रीसाठी आलेला हा चोरटा गांधी रोडवरील त्या कोणत्या चोरट्या सराफाकडे आला होता, याची चौकशी करण्यात येत आहे; मात्र सोने खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला नसल्याने सदर चोरटा सराफा या प्रकरणातूनही अलगद बाहेर पडल्याची चर्चा आहे. पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्नचोरट्यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने हे सोने सापडल्याची माहिती पोलिसांना दिली; मात्र पोलिसांनी त्यावर विश्वास न ठेवता चोरट्यास पोलीस कारवाईचा धाक दाखवताच त्याने सदर चोरीच्या सोन्याची कबुली देत ते गांधी रोडवरील सराफाकडे विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीThiefचोर