गोयनका, रुंगटाला अखेर मिळाला जामीन

By Admin | Updated: August 28, 2015 00:04 IST2015-08-28T00:04:09+5:302015-08-28T00:04:09+5:30

युवकाचे लैंगिक शोषण प्रकरण.

Goenka, Rungta finally get bail | गोयनका, रुंगटाला अखेर मिळाला जामीन

गोयनका, रुंगटाला अखेर मिळाला जामीन

अकोला: राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयातील रोजंदारीवर काम करणार्‍या युवकाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणातील आरोपी निरंजनकुमार गोयनका व जुगलकिशोर रुंगटा यांना अखेर जामीन मिळाला. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एन. तांबी यांच्या न्यायालयाने गुरुवारी सायंकाळी दोघांचा जामीन मंजूर केला. गत २0 दिवसांपासून आरोपी कारागृहात होते. भारतीय सेवा सदनचे माजी पदाधिकारी निरंजनकुमार गोयनका व जुगलकिशोर रुंगटा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यावर त्यांनी जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालयात जामीन मिळविण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले. परंतु त्यांना दोन्ही न्यायालयांनी जामीन नाकारल्यानंतर १0 ऑगस्ट रोजी दोघांनीही सिव्हिल लाइन पोलिसांसमोर शरणागती पत्करली. पोलिसांनी दोघांचीही पोलीस कोठडी घेतल्यानंतर, न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आरोपींनी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी एस.एस. जांभळे यांच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. परंतु न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला. आरोपींनी पुन्हा जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एन. तांबी यांच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. अर्जावर सुनावणी झाली; परंतु न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. अखेर गुरुवारी न्यायालयाने गोयनका व रुंगटाला जामीन मंजूर केला. सरकारतर्फे साहाय्यक सरकारी विधिज्ञ परवेज डोकाडिया यांनी, तर आरोपींतर्फे अँड. मुन्ना खान यांनी बाजू मांडली.

Web Title: Goenka, Rungta finally get bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.