लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : औद्योगिक वसाहतीत एम. आर. फर्निचर मॉलच्या मागे असलेल्या वर्कशॉपला मंगळवारी दुपारी ३ वाजता आग लागल्याची घटना घडली. वेल्डिंग वर्कशॉपमध्ये ठिणगी पडून ही आग लागल्याचा कयास व्यक्त करण्यात येत आहे. या आगीत दोन ते तीन दुचाक्या व वर्कशॉपमधील साहित्य जळून खाक झाले. एकूण तीन लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.मनोज वोरा यांच्या मालकीच्या अरिहंत एंटरप्रायजेसचे एमआयडीसीत गोदाम असून, मंगळवारी दुपारी ३ वाजता या गोदामातील साहित्याला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तत्काळ घटनास्थळी रवाना झाल्या. त्यांनी वर्कशॉपमधील आगीवर नियंत्रण मिळविले. ये थील अरिहंत एंटरप्रायजेसचे फर्निचर मॉल असून, त्याचे मालक मनोज वोरा आहेत. दोन अग्निशमन दलाच्या बंबांनी ही आग आटोक्यात आणली.
‘एमआयडीसी’त गोदामाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:27 IST
अकोला : औद्योगिक वसाहतीत एम. आर. फर्निचर मॉलच्या मागे असलेल्या वर्कशॉपला मंगळवारी दुपारी ३ वाजता आग लागल्याची घटना घडली. वेल्डिंग वर्कशॉपमध्ये ठिणगी पडून ही आग लागल्याचा कयास व्यक्त करण्यात येत आहे.
‘एमआयडीसी’त गोदामाला आग
ठळक मुद्देआगीत दोन ते तीन दुचाक्या व वर्कशॉपमधील साहित्य जळून खाक झाले. तीन लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज