शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

‘जीएमसी’तून सर्वोपचार वेगळे करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 12:51 PM

‘जीएमसी’तून सर्वोपचार रुग्णालय वेगळे करण्यात यावे, असा ठराव जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत शनिवारी मंजूर करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी)अंतर्गत सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी ‘जीएमसी’तून सर्वोपचार रुग्णालय वेगळे करण्यात यावे, असा ठराव जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत शनिवारी मंजूर करण्यात आला. हा ठराव शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्याचेही सभेत ठरविण्यात आले.अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत सर्वोपचार रुग्णालयात जिल्ह्यातील ग्रामीण भागातून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांवर उपचार व्यवस्थित करण्यात येत नाहीत. पैसे देऊन पावती फाडल्यानंतर रुग्णांना बाहेरून औषध आणण्याचे सांगितले जाते. तसेच रुग्णांना व्यवस्थित वागणूक दिली जात नाही आणि रुग्णालयांत अस्वच्छता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत सर्वोपचार रुग्णालयात होणारी हेळसांड थांबविण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सर्वोपचार रुग्णालय वेगळे करून, पूर्वीप्रमाणे जिल्हा शल्यकित्सक कार्यालयांतर्गत सर्वोचार रुग्णालयाचा कारभार चालविण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य शोभा शेळके यांनी सभेत केली. त्यांच्या या मागणीला समितीच्या इतर सदस्यांनीही समर्थन देत ‘जीएमसी’तून सर्वोचार रुग्णालय वेगळे करण्याची मागणी लावून धरली. सदस्यांच्या मागणीनुसार ‘जीएमसी’तून सर्वोपचार रुग्णालय वेगळे करण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. हा ठराव शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्याचेही सभेत ठरविण्यात आले. जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाची कामे, ग्रामीण भागातील समस्यांसह विविध मुद्यांवर समितीच्या सदस्यांनी सभेत प्रश्न उपस्थित केले. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला उपाध्यक्ष जमीरउल्लाखा पठाण, समाजकल्याण सभापती रेखा अंभोरे, कृषी सभापती माधुरी गावंडे, महिला-बालकल्याण सभापती देवका पातोंड यांच्यासह समिती सदस्य दामोदर जगताप, चंद्रशेखर पांडे गुरुजी, गोपाल कोल्हे, शोभा शेळके, रामदास लांडे, गजानन उंबरकार व संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Akola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयAkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद