विकासासाठी काँग्रेसला सत्ता द्या- पृथ्वीराज चव्हाण

By Admin | Updated: October 5, 2014 02:31 IST2014-10-05T02:24:29+5:302014-10-05T02:31:48+5:30

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची तेल्हारा येथे प्रचारसभा.

Give Congress power for development: Prithviraj Chavan | विकासासाठी काँग्रेसला सत्ता द्या- पृथ्वीराज चव्हाण

विकासासाठी काँग्रेसला सत्ता द्या- पृथ्वीराज चव्हाण

तेल्हारा (अकोला) : महाराष्ट्राचे हित व विकासासाठी काँग्रेसच्या हातात सत्ता द्या, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी केले. ते तेल्हारा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आयोजित विधानसभा निवडणूक प्रचार सभेत बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हिदायत पटेल होते. आमदार पाच वर्ष कोणता विकास करीत होते, हे तुम्हाला माहितीच असून, या निवडणुकीत कोण किती पाण्यात आहे, हे दिसणार आहे, असेही चव्हाण म्हणाले. यावेळी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री सुधाकरराव गणगणे, महेश गणगणे, लक्ष्मणराव पाटील, माजी नगराध्यक्ष दयालसिंह बलोदे, डॉ. अशोक बिहाडे, अँड. रमेश श्रावगी, बद्रुज्जमा, सहदेवराव भोपळे, मुन्ना मिरसाहेब, अतुल ढोले, संजय आठवले, साजीद खाँ पठाण, प्रा. मुकुंद खैरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत देशमुख तर संचालन अँड. पवन शर्मा यांनी केले. आभार सुधाकरराव गणगणे यांनी मानले.

Web Title: Give Congress power for development: Prithviraj Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.