शेतक-यांना हेक्टरी ५0 हजार द्या!
By Admin | Updated: December 20, 2014 00:43 IST2014-12-20T00:43:15+5:302014-12-20T00:43:15+5:30
शेतकरी जागर मंचची अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक.

शेतक-यांना हेक्टरी ५0 हजार द्या!
अकोला : जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून, कोणतीही अट न लावता शेतकर्यांना कर्जमुक्ती व वीज बिलमाफी आणि हेक्टरी ५0 हजार रुपयांची मदत देण्यात यावी आदी मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा, कोणतीही अट न लावता शेतकर्यांना कर्जमुक्ती व वीज बिलमाफी देण्यात यावी, दुष्काळग्रस्त शेतकर्यांना हेक्टरी ५0 हजार रुपयांची मदत देण्यात यावी, पुढील वर्षी पीक उभे करण्यासाठी शेतकर्यांना एकरी ५0 हजार रुपयांचे कर्ज देण्यात यावे व या कर्जाची परतफेड पाच वर्षांत करण्यात यावी, वन्यप्राण्यांपासून शेतीपिकांच्या उत्पन्नाची नुकसानभरपाई देण्यात यावी, कृषिपंपांना दिवसा दहा ते बारा तास वीजपुरवठा करण्यात यावा, पीक विम्याचे निकष बदलून ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांमधील शेतकर्यांना सरसकट पीक विम्याचा लाभ मिळावा, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची कामे दोन वर्षात पूर्ण करण्यात यावी, खारपाणपट्टय़ात विहीर, बोअरच्या कामांसाठी अनुदान देण्यात यावे, सोयाबीनला प्रतिक्विंटल पाच हजार रुपये व कापसाला प्रतिक्विंटल सात हजार रुपये भाव देण्यात यावा यांसह इतर मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.