दिवा अंगावर पडल्याने बालिकेचा करूण अंत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:17 AM2021-03-07T04:17:44+5:302021-03-07T04:17:44+5:30

अकोट शहरातील पालेकर कुटुंबातील अनिल पालेकर यांची मुलगी भुमिका हिने संत गजानन महाराज प्रकटदिन उत्सव निमित्ताने साडी घातली होती. ...

The girl's pity ends when the lamp falls on her body! | दिवा अंगावर पडल्याने बालिकेचा करूण अंत!

दिवा अंगावर पडल्याने बालिकेचा करूण अंत!

Next

अकोट शहरातील पालेकर कुटुंबातील अनिल पालेकर यांची मुलगी भुमिका हिने

संत गजानन महाराज प्रकटदिन उत्सव निमित्ताने

साडी घातली होती. घरात पूजा झाल्यानंतर अचानक दिवाला साडीचा स्पर्श झाल्याने साडीने पेट घेतला. मात्र आई वडील रागावतील म्हणून तिने स्वतःच पेटलेली साडी हाताने विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र साडीने अधिक पेट घेतला. वेदना असह्य झाल्याने भुमिकाने आरडाओरडा केली. त्यानंतर लगेच आई-वडिलांनी धाव घेत आग विझवली. या घटनेत त्यात भुमिका चांगलीच जळाली होती. तिला तात्काळ उपचारासाठी रात्री अकोला येथे दाखल केले. परंतु नियतीने डाव साधला. ६ मार्च रोजी सकाळी भुमिकाचा मृत्यू झाला. भुमिका नेहमीच उत्सव, धार्मिक कार्यक्रमात हौशीने सहभागी व्हायची. द विद्याचंल स्कुलमध्ये इयत्ता पाचवीत शिकत होती. दुदैवी घटनेमुळे अकोट शहरात शोककळा पसरली आहे.

फोटो: भुमिका

Web Title: The girl's pity ends when the lamp falls on her body!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.