मुलींच्या निकालाचा टक्का वाढला!
By Admin | Updated: May 31, 2017 01:56 IST2017-05-31T01:56:59+5:302017-05-31T01:56:59+5:30
मुलींचा ९३.१४, तर मुलांचा ८७ टक्के निकाल

मुलींच्या निकालाचा टक्का वाढला!
अकोला : जिल्ह्यात मुलींच्या निकालात यावर्षी तीन टक्क्यांनी वाढ झाली. जिल्ह्यात ९३.१४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या, तर मुलांच्या निकालाची टक्केवारी ८७ टक्के आहे. यावर्षी जिल्ह्यातून १२,३४३ मुलींनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ११,४९६ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. गेल्यावर्षी मुलींच्या निकालाची टक्केवारी ९०.४२ होती. यावर्षी त्यामध्ये वाढ होऊन ती ९३ टक्क्यांवर पोहोचली आहे. मुलांच्या टक्केवारीही तीन टक्क्यांनी वाढली आहे.
गेल्यावर्षी मुलांचा निकाल ८४ टक्के लागला होता. अकोला तालुक्यात मुलींचा निकाल ९३.९३, अकोट तालुक्यात ९५ टक्के, तेल्हारा तालुक्यात ९३.९६ टक्के, बार्शीटाकळी ९१.८६ टक्के, बाळापूर ९१.३६ टक्के, पातूर ९०.८३ तर मूर्तिजापूर तालुक्यातील ९०.७३ टक्के लागला आहे.
मधुरा मोघे वाणिज्य शाखेतून जिल्ह्यात अव्वल
एलआरटी वाणिज्य महाविद्यालयातील मधुरा मोघे हिने ६५० पैकी ६१६ गुण मिळवित मधुराच्या गुणांची टक्केवारी ९४.७६ टक्के असून, वाणिज्य शाखेतून मधुरा अव्वल आली आहे. साक्षी करवा आणि निकिता अग्रवाल या दोघींनी ६५० पैकी ६१४ गुण मिळवित संयुक्त दुसरा क्रमांक पटकावला आहे. एलआरटीच्या ४९ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेत यश प्राप्त केले.
अकोला, अकोटचा सर्वाधिक निकाल
जिल्ह्यात अकोला आणि अकोट तालुक्याचा जिल्ह्यात सर्वाधिक निकाल लागला आहे. दोन्ही तालुक्यांचा ९२.७ टक्के निकाल लागला. त्यानंतर तेल्हारा तालुक्याचा ९०.४६, मूर्तिजापूर तालुक्याचा ८६.९६ टक्के, पातूर तालुक्याचा ८६.५४, बार्शीटाकळी तालुक्याचा ८६.३९ टक्के अािण बाळापूर तालुक्याचा सर्वात कमी ८६.३६ टक्के निकाल लागला.