पीडित मुलीने बाळास स्वीकारण्यास दिला नकार

By Admin | Updated: December 22, 2014 01:15 IST2014-12-22T01:15:12+5:302014-12-22T01:15:12+5:30

जावयाने लादले मातृत्व.

The girl refused to accept the child | पीडित मुलीने बाळास स्वीकारण्यास दिला नकार

पीडित मुलीने बाळास स्वीकारण्यास दिला नकार

अकोला: नात्याची तमा न बाळगता बहीण जावयाने अल्पवयीन साळीचे लैंगिक शोषण करून तिच्यावर मातृत्व लादले. पीडित मुलीने स्त्री रुग्णालयात मुलीस जन्म दिला; परंतु या मुलीस पीडितेने व तिच्या आईने स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे पोलिसांना आता पेच पडला आहे. बाळ कुणाच्या ताब्यात द्यावे, असा प्रश्न निर्माण झाला.
दर्यापूर तालुक्यातील एका गावात राहणार्‍या १५ वर्षीय मुलीचे बहीणजावई मंगेश गुंबळे याने आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत खल्लार परिसरातील सूतगिरणीजवळील शेतामध्ये लैंगिक शोषण केले होते. त्यानंतरही त्याने मुलीच्या घरी येऊन सातत्याने तिचे लैंगिक शोषण केले. त्यातून मुलीला दिवस गेले. पीडितेने १ डिसेंबर रोजी स्त्री रुग्णालयात मुलीला जन्म दिला. या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी मंगेश गुंबळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
येवदा पोलिसांनी मंगेश गुंबळे याला मंगळवारी दुपारी अटक केली. त्यानंतर शुक्रवारी पीडित व तिच्या आईने रामदासपेठ पोलिसांसोबत संपर्क साधून, नवजात बाळाचे पालकत्व स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला. पोलिसांनी पीडित व तिच्या आईची समजूत घालण्याचा प्रयत्न केला; परंतु पीडिता व तिच्या आईने नवजात बाळ आम्हाला नको आहे. त्याची व्यवस्था तुम्हीच करा. असे म्हटल्याने, पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाला.

Web Title: The girl refused to accept the child