पोपटखेड धरणात बुडाल्याने बालिकेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 16:47 IST2020-06-09T16:26:01+5:302020-06-09T16:47:38+5:30
येथील धरणात बुडाल्याने रुधाडी येथील आठ वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना १० जून रोजी घडली.

पोपटखेड धरणात बुडाल्याने बालिकेचा मृत्यू
ठळक मुद्देधरणात सध्या मोठ्या प्रमाणात जलसाठा आहे.परिसरातील युवक, लहान मुले आंघोळीसाठी जातात. अंजली कासदेकर ही बालिका पोहत असताना अचानक खोल पाण्यात गेली.
पोपटखेड : येथील धरणात बुडाल्याने रुधाडी येथील आठ वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना १० जून रोजी घडली. अंजली दुर्गाप्रसाद कासदेकर असे मृतक बालिकेचे नाव आहे.
पोपटखेड येथील धरणात सध्या मोठ्या प्रमाणात जलसाठा आहे. या जलसाठ्यात परिसरातील युवक, लहान मुले आंघोळीसाठी जातात. मंगळवारी रुधाडी येथील अंजली कासदेकर ही बालिका पोहत असताना अचानक खोल पाण्यात गेली. तेथून निघता न आल्याने तिचा मृत्यू झाला. ग्रामस्थांच्या ही बाब निदर्शनास येताच तिला तातडीने बाहेर काढण्यात आले. पोपटखेड धरणावर कुठलीही सुरक्षितता नसल्याचे चित्र आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.