शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा मुलींचीच बाजी!

By admin | Updated: June 14, 2017 02:20 IST

जिल्ह्याचा एकूण निकाल ८४% : जिल्ह्यात पातूर तालुका अव्वल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मोठ्या प्रतीक्षेनंतर १३ जून रोजी राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये अकोला जिल्ह्याचा निकाल ८४.०२ टक्के लागला आहे. टक्केवारीत बारावीच्या निकाला पाठोपाठ दहावीतही मुलींनीच आघाडी घेतली आहे. ८६.५ टक्के प्राप्त करू न पातूर तालुका निकालात जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. अकोल्याच्या हिंदू ज्ञानपीठची विद्यार्थीनी गायत्री सरोदे हिने ९९.६० टक्के गुण घेऊन अव्वल स्थान पटकाविले आहे तर बाल शिवाजी कॉन्व्हेंटच्या सुरभी देशपांडे व आरोही खोडकुंभे या दोघींनी ९९.२० टक्के गुण मिळविले आहेत. विशेष म्हणजे या तिघींच्या गुणांच्या टक्केवारीमध्ये क्रीडा गुणांचा समावेश नसल्याने त्यांचे यश नेत्रदिपक ठरले आहे. जिल्ह्यातील २८,४१३ विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी परीक्षा दिली होती. त्यापैकी २३,८७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ११,९९६ मुले तर ११,८७८ मुलींचा समावेश आहे. निकाल जाहीर होताच शहरातील विविध शाळांमधील विद्यर्थ्यांनी जल्लोष केला. भारत विद्यालय, विवेकानंद शाळा व बाल शिवाजी हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींनी जल्लोष करून आनंद व्यक्त केला.जिल्ह्यात यावर्षी पातूर तालुक्याने बाजी मारली असून, तालुक्याचा निकाल ८२.८३ असा लागला आहे. अकोला तालुका दुसऱ्या क्रमांकावर असून, या तालुक्याचा निकाल हा ८५.०७ टक्के एवढा आहे. बाळापूर निकाल ८४.९९ टक्के, बार्शीटाकळी ८४.९३ टक्के, अकोट ८१.३५ तर तेल्हारा तालुक्याचा निकाल ८०.५१ टक्के एवढा लागला आहे.४,५३९ विद्यार्थी अनुत्तीर्ण जिल्ह्यात एकूण नोंदणीपैकी प्रत्यक्षात २८,४१३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २३,८७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजेच ४,५३९ विद्यार्थी यावर्षी अनुतीर्ण झाले आहेत. ही टक्केवारी १५.९८ एवढी आहे.