‘गझलतरंग’ला रसिक श्रोत्यांची भरभरून दाद

By Admin | Updated: February 16, 2015 02:04 IST2015-02-16T02:04:52+5:302015-02-16T02:04:52+5:30

मराठी गझल मुशायरात विदर्भातील गझलकारांनी घेतला भाग.

'Gazlatarang' is full of fun and entertaining entertainers | ‘गझलतरंग’ला रसिक श्रोत्यांची भरभरून दाद

‘गझलतरंग’ला रसिक श्रोत्यांची भरभरून दाद

अकोला : पुष्पलता वाघ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरेश भट गझल मंच पुणे द्वारा आयोजित ह्यगझलतरंगह्ण या कार्यक्रमाला अकोलेकर रसिक श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. रविवार, १५ फेब्रुवारीला सायंकाळी प्रमिलाताई ओक सभागृहात पार पडलेल्या या दर्जेदार मराठी गझल मुशायरा कार्यक्रमाच्या अध्यस्थानी ज्येष्ठ गझलकार प्रा.डॉ. श्रीकृष्ण राऊत उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. दोन फेर्‍यांमध्ये पार पडलेल्या या गझल गायनाच्या कार्यक्रमाला बीड येथून आलेले सतीश दराडे यांनी प्रारंभ केला. ह्यकाय न्यावे सोबती जन्मभरीचा पसारा वाढतो..ह्ण ही गझल सादर केली. त्यानंतर अकोल्याचे प्रकाश मोरे यांनी सादर केलेल्या ह्ययेतात टक्करीला हेले तर्‍हे तर्‍हेचेह्ण व ह्यजन्मालाही नसते ठावे आल्यानंतर कोठे जावे.ह्ण या दोन्ही गझलांना रसिक श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. तदनंतर मुंबईचे सुधीर मुळीक यांनी ह्यआज नवीन प्रयोगासाठी विषयांचा तोटा आहे, आईनस्टाईनपेक्षा आज व्हॅलेंटाइन मोठा आहे.ह्ण ही गझल सादर केली. यानंतर चंद्रपूरचे किशोर मुगल यांची ह्यशून्य बाकी तरी खात्यात नाही, मीच काही एकटा घाट्यात नाही.ह्ण ही गझल दाद मिळवून गेली. ह्यजंक्शन सुटलेल्या गाड्यांना स्टेशनचे आकर्षण नसते, दु:खाचे लक्षण नसते तर आज येथे इतके जण नसते.ह्ण या त्यांच्या गझलेनेदेखील रसिकांच्या भरभरून टाळय़ा मिळविल्या.

Web Title: 'Gazlatarang' is full of fun and entertaining entertainers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.