गायत्री मंत्रोच्चाराने राजेश्‍वरनगरी भक्तीमय

By Admin | Updated: December 23, 2015 02:39 IST2015-12-23T02:39:14+5:302015-12-23T02:39:14+5:30

१0८ कुंडीय गायत्री महायज्ञ संस्कार महोत्सवास प्रारंभ; हजारो भाविकांचा सहभाग.

Gayatri Mantra chanting Rajeshwaranagari devotional | गायत्री मंत्रोच्चाराने राजेश्‍वरनगरी भक्तीमय

गायत्री मंत्रोच्चाराने राजेश्‍वरनगरी भक्तीमय

अकोला : अखिल भारतीय गायत्री परिवार, शांतीकुंज हरिद्वार यांच्यावतीने येथील मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात मंगळवार, २२ डिसेंबरपासून १0८ कुंडीय गायत्री महायज्ञास सुरुवात झाली. विद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या ह्यभक्तिधामह्णमध्ये तयार करण्यात आलेल्या १0८ यज्ञकुंडांमध्ये गायत्री मंत्रोच्चारात विविध गावांमधून आलेल्या शेकडो दाम्पत्यांनी आहुती अर्पण केली. यज्ञशाळेतील गायत्री मंत्रोच्चाराने अवघ्या राजेश्‍वरनगरीचे वातावरण भक्तिमय होऊन गेले. मंगळवारी सकाळी ८ वाजता शांतीकुंज हरिद्वारचे प्रतिनिधी कैलाश महाजन (महाराष्ट्र झोन प्रभारी) यांच्या मार्गदर्शनाखाली गायत्री महायज्ञ व विविध संस्कार कार्यक्रमांना प्रारंभ करण्यात आला. या यज्ञामध्ये सहभागी होण्यासाठी दररोज १00 गावांमधून ४00 दाम्पत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. सकाळी ८ ते ११ या महायज्ञ करण्यात आला. पहिल्या दिवशी सुमारे साडेसातशे महिला व पुरुषांनी यज्ञात समिधा अर्पण केल्या. भगवे वस्त्र धारण केलेल्या भाविकांमुळे अवघा सभामंडप भगवामय होऊन गेला होता. हा महायज्ञ महोत्सव आणखी दोन दिवस चालणार आहे.

Web Title: Gayatri Mantra chanting Rajeshwaranagari devotional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.