गॅस सिलिंडरचा भडका, अनर्थ टळला
By Admin | Updated: October 17, 2014 01:07 IST2014-10-17T01:07:49+5:302014-10-17T01:07:49+5:30
अकोला येथील हरिहरपेठेतील घटना.
गॅस सिलिंडरचा भडका, अनर्थ टळला
अकोला : हरिहरपेठेतील एका घरामध्ये गॅस सिलिंडरचा भडका झाल्याने एकच खळबळ उडाली होती; परंतु समयसूचकतेने पुढील अनर्थ टळला. ही घटना शुक्रवारी सकाळी ९.३0 वाजताच्या सुमारास घडली.
महापालिकेतील कर्मचारी संतोष मुकुंदराव सूर्यवंशी यांचे हरिहरपेठ परिसरात घर आहे. शुक्रवारी त्यांच्याकडे महालक्ष्मीचा कार्यक्रम होता. त्यानिमित्त प्रसादाचेसुद्धा आयोजन केले होते. घरामध्ये स्वयंपाक सुरू असताना, अचानक गॅस सिलिंडरमध्ये गळती सुरू झाली आणि सिलिंडरने पेट घेतला; परंतु संतोष सूर्यवंशी व कुटुंबीयांच्या समयसूचकतेमुळे त्यांनी आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळावर पोहोचून पाण्याचा मारा केला. गॅस सिलिंडरच्या भडक्यामुळे सूर्यवंशी यांच्या घरातील भिंती काळय़ा झाल्या हो त्या. या प्रकरणाची जुने शहर पोलिसांनी नोंद घेतली आहे.