पातुरच्या मोमिनपुऱ्यात गॅस सिलिंडरचा स्फोट, दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:18 IST2021-04-21T04:18:36+5:302021-04-21T04:18:36+5:30
पातूर शहरातील मोमिनपुऱ्यात राहणाऱ्या अल्फिया सकाळी १० वाजताच्या सुमारास स्वयंपाक घरात चहा बनवण्यासाठी गेल्या. गॅस शेगडी सुरू केल्यावर अचानक ...

पातुरच्या मोमिनपुऱ्यात गॅस सिलिंडरचा स्फोट, दोघे जखमी
पातूर शहरातील मोमिनपुऱ्यात राहणाऱ्या अल्फिया सकाळी १० वाजताच्या सुमारास स्वयंपाक घरात चहा बनवण्यासाठी गेल्या. गॅस शेगडी सुरू केल्यावर अचानक गॅस सिलिंडरचा भडका उडाला. यामध्ये अल्फिया यांचे हात आणि पाय भाजले. सिलिंडरचा स्फोट होताच अल्फिया यांनी आरडाओरड सुरू केली. त्यांच्या मदतीला त्यांचा भाऊ रिजवान (२८) धावून आला. यात तोसुद्धा जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच, सामाजिक कार्यकर्ते दुले खान घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर पोहोचून आगीवर पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविले. परंतु तोपर्यंत घरातील दहा हजाराची रोख रक्कम, घरातील जीवनावश्यक वस्तू, धान्य जळून खाक झाले. सिलिंडरचा भडका उडाल्याने शेजारील व्यापारी इकबाल अन्सारी यांच्या घराला आग लागली. पातूर अग्निशमन दलाचे वाहन चालक अशपाक सय्यद मुश्ताक, फायरमन प्रकाश चावरे, प्रल्हाद वानखेडे, आकाश तेजपाल आदींनी पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविले. सध्या जखमींवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
फोटो: