धनादेश अनादरप्रकरणी गॅस एजन्सी चालकास कारावास
By Admin | Updated: January 22, 2015 02:10 IST2015-01-22T02:10:34+5:302015-01-22T02:10:34+5:30
२२ लाख ५0 हजार रुपयांचा धनादेश अनादर झाल्याचे प्रकरण.
_ns.jpg)
धनादेश अनादरप्रकरणी गॅस एजन्सी चालकास कारावास
अकोला: २२ लाख ५0 हजार रुपयांचा धनादेश अनादर झाल्याप्रकरणी प्रथमश्रेणी दंडाधिकारी ए.एस. देशपांडे यांच्या न्यायालयाने शारदा गॅस सर्व्हिसच्या संचालक शारदा नामदेव वाहणे यांना ३ महिन्यांचा साधा कारावास व दंड न भरल्यास एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तक्रारकर्ते गिरधर प्रीतमदास जेठानी यांना शारदा गॅस सर्व्हिसच्या संचालक शारदा वाहणे यांनी २२ लाख ५0 हजार रुपयांचा धनादेश दिला होता. हा धनादेश बँकेत वटला नाही. त्यामुळे जेठानी यांनी न्यायालयात खटला दाखल केला. न्यायालयाने साक्षी, पुरावे व कागदपत्रांच्या आधारे शारदा वाहणे यांना ३ महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली व नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.